Hemangi Kavi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi : नेटकऱ्यांच्या कमेंट्समुळं हेमांगी कवी भडकली, काय आहे प्रकरण?

हेमांगीच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना तिने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमीच आपल्या सोशल मीडियावरील वादग्रस्त विधानांनी चर्चेत असते. हेमांगी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी सक्रीय असते. तसेच तिच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या अपडेट सोशल मिडीयाच्या माध्यमातून देत असते. हेमांगी कवीने अभिनय आणि तिच्या उत्तम विनोदबुद्धीमुळे मनोरंजन विश्वातील (Marathi Actress) तिचे स्थान पक्के केले आहे. हेमांगीचे मालिका, सिनेमे, नाटकांमधील तिच्या अभिनयामुळे तिचे लाखो चाहते आहेत.

हेमांगीच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टवर एका युजरने कमेंट करत तिच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. एका युजर हेमांगीला विचारले, 'हेमू तू आई कधी होणार...' ही कमेंट हेमांगीला आवडली नाही. नंतर त्या युजरचा हेमांगीने चांगलाच समाचार घेताला आहे.

'तुम्हाला नाही वाटत का हा खूप पर्सनल प्रश्न आहे. हा असा प्रश्न तुमच्यासारख्या शिकलेल्या व्यक्तीकडून येणं चुकीचं आहे. मी तुमची ही कमेंट इग्नोर करू शकते. पण मला तुम्हाला आणि तुमच्या सारख्या लोकांना कळवायचंय की, 'तू लग्न कधी करणार', 'तुमचा घटस्फोट झालाय का?', 'तू आई कधी होणार', 'तुम्हाला किती मुलं आहेत', 'तुमचा पगार किती आहे', हे असले पर्सनल प्रश्न कधी कुणालाही विचारु नये. धन्यवाद!' असे प्रत्युत्तर हेमांगीने त्या युजरला दिले आहे. हेमांगीच्या या उत्तराची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. हेमांगीच्या उत्तरानंतर कमेंट करणाऱ्या युजरने फेसबुक पोस्टरवरून ती कमेंट डिलीट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT