इगतपुरी रेव्ह पार्टीनंतर हीना पांचाळची कोर्टात हजेरी Saam Tv
मनोरंजन बातम्या

इगतपुरी रेव्ह पार्टीनंतर हीना पांचाळची कोर्टात हजेरी

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस आणखीनच आक्रमक झाले आहे. रेव्ह पार्टीसाठी वापरण्यात आलेले इगतपुर मधील बंगले पोलिसांनी आता सील केल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : इगतपुरी Igatpuri रेव्ह पार्टी party प्रकरणात नाशिक Nashik ग्रामीण पोलीस आणखीनच आक्रमक झाले आहे. रेव्ह पार्टीसाठी वापरण्यात आलेले इगतपुर मधील बंगले पोलिसांनी Police आता सील केल आहे. रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये अटक झालेली बिग बॉस मराठी Bigg Boss Marathi फेम मॉडेल अभिनेत्री हीना पांचाळ हिला कोर्टात हजर केले जाणार आहे. Heena Panchal appearance court after party

नाशिक ग्रामीण पोलिसांनी करण्यात आलेल्या या कारवाई मध्ये हॉटेल Hotel व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांकडून ३ बंगले सील Seal करण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई Action करण्यात आली आहे. आठवड्यापूर्वी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरी मधील स्काय ताज व्हिला Sky Taj Villa या बंगल्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी, हीनासह १ परदेशी महिला, मराठी व दाक्षिणात्य मनोरंजन विश्वा मधील अभिनेत्री, २ महिला कोरिओग्राफर यांना अटक करण्यात आली होती.

हे देखील पहा-

रेव्ह पार्टी प्रकरणात मॉडेल हीना पांचाळसह सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या सुनावणीकडे मनोरंजन विश्वासह सगळ्यांचेच लक्ष वेधून लागले आहे. मुंबईपासून काही जवळच असलेल्या, इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला या बंगल्या मध्ये हाय प्रोफाईल पार्टी जोरात सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का व ड्रग्जचे सेवन सुरु होते. बेधुंद होऊन, पार्टीत मधील सर्वजण गुंग झाले होते. Heena Panchal appearance court after party

गोपनीय माहितीच्या आधारावर इगतपुरी मधील बंगल्या मध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाली होती. पोलिसांनी छापेमारी करत असताना, पार्टी मधील असलेले १० पुरुष आणि १२ महिला अशा एकूण २२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतले आहे.

अटक झालेल्या, व्यक्तीं मधील बिग बॉस मराठी फेम मधील अभिनेत्री हीना पांचाळचा या प्रकरणात समावेश आहे. याशिवाय, इटालियन महिला, मराठी व दाक्षिणात्य मनोरंजन विश्वा मधील अभिनेत्री, बॉलिवूडच्या २ महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आले आहे. अभिनेत्री मलायका अरोराची लूक अलाईक अशी प्रसिद्ध असणारी डान्सर हीना पांचाळ बिग बॉस मराठी मधील दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी होती. Heena Panchal appearance court after party

मात्र, महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपल होत. हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांमध्ये चांगली भूमिका केली होती. हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये ती अनेक आयटम साँग्ज मध्ये उत्तम प्रकारे झळकली आहे. मुझसे शादी करोगे? या रिअॅलिटी शोमध्ये देखील ती सहभागी झाली होती. हीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वर्कआउट करतानाचे व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध होत आहेत. हीनाचे अनेक टीकटॉक व्हिडीओही देखील व्हायरल झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का?" उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल|VIDEO

Maharashtra Live News Update: मावळच्या शेतकऱ्यांचा रिंग रोडला तीव्र विरोध

Illegal betting case: काँग्रेस आमदाराला ईडीने ठोकल्या बेड्या, १२ कोटींची कॅश अन् ६ कोटींचं सोनं जप्त

HIV Awareness : मच्छर चावल्यास HIVचा संसर्ग पसरु शकतो का?

'काँग्रेस आमदारानं मेसेज करून शारीरिक संबंधाची मागणी..' ट्रान्सजेंडरकडून गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT