Pushpa impossible | मुंबई, ५ ऑगस्ट: सोनी सबवरील मालिका 'पुष्पा इम्पॉसिबल'(Pushpa impossible) मर्यादांना पार करत वय व रूढींना न जुमानता उपलब्धी संपादित करत आहे. एक प्रचलित वाक्य आहे 'लोक काय म्हणतील याचा आपण विचार करत राहिलो तर लोक काय म्हणतील?' या वाक्याला कृतीत आणत सोनी सबची पुष्पा (करूणा पांडे) अद्वितीय उत्साह व जोशाने तिचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न साकारत आहे. पडद्यावर तिचे हे प्रयत्न सुरू असताना वास्तविक जीवनात कोणीतरी आहे, जिने हे अविश्वसनीय यश संपादित केले आहे. भेटा ५३ वर्षीय महिला कल्पना जांभळे यांना, ज्यांनी ३७ वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा शिक्षण घेण्यास सुरूवात केली आणि त्या एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासोबत उत्तम गुणांसह पदवीधर देखील झाल्या.
रीअल-लाइफ पुष्पाला सन्मानित करण्यासाठी आपल्या रील लाइफ पुष्पाने मालिका 'पुष्पा इम्पॉसिबल'च्या सेटवर त्यांना भेट देण्यास आमंत्रित केले आणि त्या उत्साहवर्धक परस्परसंवादी सत्रामध्ये गुंतून गेल्या. त्यांनी पुष्पा सारख्या लाखो प्रबळ समविचारी महिलांना प्रेरित करण्याची आशा व्यक्त केली. स्वत:वरील प्रेमासाठी वयाचे कोणतेच बंधन नाही आणि पुष्पा इम्पॉसिबलचा देशभरात ही भावना जागृत करण्याचा मनसुबा आहे.
आपले घर अबाधित ठेवण्यासाठी लढताना आणि मुलांच्या समस्यांची काळजी घेताना अविरत समस्यांचा सामना करावा लागलेल्या पुष्पाने स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय सोडले नाही. पुष्पाचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे आणि अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. ती तिच्या संघर्षांचा सामना कशाप्रकारे करते आणि नशीबाच्या फेऱ्यापासून चॅम्पियन कशाप्रकारे बनते हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहत राहा. करूणा पांडे व्यतिरिक्त या मालिकेमध्ये नवीन पंडित, दर्शन गुज्जर, देश्ना दुगड, गरिमा परिहार, भक्ती राठोड हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत.
कल्पना यांना भेटण्याबाबत पुष्पाची भूमिका साकारणा-या करूणा पांडे म्हणाल्या, ''मी स्वत: महिला असल्यामुळे मला विशिष्ट वेळेनंतर स्वत:साठी काहीतरी करण्याचे ठरवल्यानंतर समाजाला काय वाटते हे चांगले माहित आहे. हे अत्यंत त्रासदायक व संशयास्पद होऊन जाते, जेथे समाज तुमचे वय आणि त्यानुसार असणा-या जबाबदा-यांबाबत टिका करतात. पण मला आनंद होत आहे की, काळ बदलत आहे आणि महिला स्वत:हून निर्णय घेण्यासोबत त्यांच्या मध्य-वयात जबाबदार बनत आहे. कल्पना या अशाच प्रकारच्या एक उदाहरण आहेत आणि मला खात्री आहे की, अशा अनेक महिला असतील.
कल्पना यांना भेटल्याने सन्माननीय वाटण्यासोबत आनंद झाला. त्या सर्व महिलांसाठी प्रेरणास्रोत आहेत. महिलांनो, कृपया स्वप्ने पाहणे सोडू नका. कल्पना येथे तुम्ही तुमच्या ध्येयांशी कटिबद्ध राहिलात तर स्वत:ची स्वप्ने कशाप्रकारे साकारू शकता हे दाखवून देण्यासाठी आल्या आहेत.'' पाहत राहा 'पुष्पा इम्पॉसिबल' दर सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सबवर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.