Deepika Padukone Diet News Instagram
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone Diet : दीपिका पादुकोणला लागले पॅनकेक्स आणि समोशाचे डोहाळे, प्रेग्नेंसीमध्ये बदललाय डाएट

Deepika Padukone On Diet Misconceptions : प्रेग्नेंट असल्याची घोषणा केल्यापासून दीपिका तिच्या रूटीनची अपडेट इन्टाग्रामवर देत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती ही माहिती देत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैष्णवी राऊत, साम टिव्ही

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत आहे. ती या काळातील प्रत्येक गोष्टी आनंदाने जगताना दिसतेय. हे समजतं दीपिकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून. प्रेग्नेंट असल्याची घोषणा केल्यापासून दीपिका तिच्या रूटीनची अपडेट इन्टाग्रामवर देत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती ही माहिती देत असते. ज्यावर तिचे चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

आताही दीपिकाच्या अशाच एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेढलंय. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट काही खाद्यपदार्थांचा फोटो शेअर केलाय. यात व्हिप्ड क्रिमने सजवलेला पॅनकेक, आईसक्रिमसह ब्राऊनी आणि चटणीसोबत समोसा दिसतोय.

हा फोटो शेअर करत तिने माहितीपूर्ण कॅप्शनही दिलंय. यात दीपिकाने सुरूवातीलाच लिहीलंय - काय? माझ्या फीडवर हा फोटो पाहून सर्प्राईज झालात ना? त्यापुढे दीपिकाने लिहीलंय की, "बाबांनो, मी खाते, आणि भरपूर खाते. मला ओळखणाऱ्या कुणालाही तुम्ही विचारू शकता. त्यामुळे तुम्ही इतर काही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका."

दीपिकाने पुढे एक ट्रिकही सांगितली आहे. तिने सांगितलंय की, "समतोल, सुसंगत आणि शरीराचं ऐकून त्याला झेपेल तितकंच खाणं" पुढे तिने डायटबद्दलही माहिती दिलीय. दीपिका म्हणाली की, "डायटबद्दल खुप चुकीच्या धारणा आहेत. अनेकांना वाटतं की, डायट करणं म्हणजे उपाशी राहाणं, कमी खाणं किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही, त्या सर्व बळजबरीने खाणं. पण तसं नाहीय. खरंतर, एखाद्या व्यक्तीने एकूण काय खाल्लंय, पिलंय त्याला 'डायट' म्हणतात . हा शब्द ग्रीक भाषेतील 'डायटा' वरून घेण्यात आला आहे, ज्याचा अर्थ 'जीवनाचा मार्ग' असा होतो.

यानंतर दीपिकाने सांगितलं की, ती नेहमीच 'संतुलित आहार' घेते आणि हाच तिच्या 'जीवनाचा मार्ग' आहे. तिने कधीच असा डायट केला नाही ज्यात ती सातत्य बाळगू शकणार नाही.

दीपिकाने या पोस्टच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांचे अनेक संभ्रम दूर केले आहेत. अभिनेत्री कमी खातात, त्यांचा विशेष आहार असतो, ते फक्त सलाड खातात, कच्च्या भाज्यांवर जगतात, अशा अनेक समजांना दीपिकाने खोडून काढलंय. आणि यासाठी तिने आपल्या प्रेग्नेंसीच्या चमचमीत खाद्यपदार्थांचा आधार घेतलाय.

दीपिकाने या पोस्टबद्दल प्रतिक्रिया देखील मागवली आहे. आणि पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, दीपिका चाहत्यांशी किती कनेक्ट आहे. तुमच्या माहितीसाठी, दीपिका आणि रणवीरने फेब्रुवारीमध्ये प्रेग्नेंसीची बातमी जाहीर केली होती. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर दोघेही रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात एकत्र दिसतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT