HBD Sanjay Dutt  SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या चाहतीने त्याच्या नावावर ७२ कोटी रुपयांची संपत्ती केली होती. त्याचे पुढे काय झालं? जाणून घ्या

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा आज वाढदिवस आहे.

संजय दत्तला बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणून ओळखले जाते.

संजय दत्तच्या चाहतीने त्याच्या नावावर ७२ कोटी रुपयांची संपत्ती केली होती.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा (Sanjay Dutt) आज (29 जुलै) वाढदिवस आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याला बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणून ओळखले जाते. त्याच्या स्टाइल आणि अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. चाहते कायम आपल्या आवडत्या कलाकारांसाठी काही ना काही करताना दिसतात. संजय दत्तच्या चाहतीने देखील अशीच एक खास गोष्ट अभिनेत्यासाठी केली.

संजय दत्तच्या चाहतीने तिची सर्व संपत्ती मृत्यूनंतर आवडत्या अभिनेत्याच्या म्हणजे संजय दत्तच्या नावावर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्तच्या चाहतीने तब्बल 72 कोटी रुपयांची संपत्ती त्याच्या नावावर केली होती. 2018 ला संजय दत्तला पोलिसांनी फोन करून ही धक्कादायक बातमी दिली. महिला चाहतीने बँकेला पत्र लिहून तिची संपूर्ण संपत्ती संजय दत्तच्या नावावर करण्याची विनंती केली होती.

एका मिडिया मुलाखतीत संजय दत्तला याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा संजय दत्त म्हणाला की, "होय.. माझ्या एका चाहतीने माझ्या नावावर 72 कोटी रुपयांची संपत्ती केली होती. मात्र मी ते सगळे पैसे तिच्या कुटुंबाला परत दिले आहे" संजय दत्तला कायमच आपल्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे.

संजय दत्त वर्कफ्रंट

संजय दत्तने 1981मध्ये रिलीज झालेल्या 'रॉकी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'रॉकी' हा रोमँटिक ॲक्शन चित्रपट आहे. अलिकेड संजय दत्त 'हाऊसफुल 5'मध्ये पाहायला मिळाला. तसेच तो रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात देखील झळकणार आहे. तसेच रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातही एका हटके अंदाजात संजय दत्त दिसणार आहे.

संजय दत्तचा वाढदिवस कधी असतो?

29 जुलै

संजय दत्तच्या नावावर चाहतीने किती रुपयांची मालमत्ता केली?

७२ कोटी

संजय दत्तने चाहतीच्या मालमत्तेचे काय केले?

कुटुंबाला पैसे परत दिले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoid Coffee Benefits: 15 दिवस कॉफी बंद केल्याने शरीरात काय बदल होतात?

Period Cramps Remedies : पीरियड्समधील वेदना शून्य मिनिटांत होतील कमी; 'हे' ५ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर

Manohar Mama Bhosale : भोंदू मनोहरच्या वाढदिवसाला होती चक्क ९० आमदारांची उपस्थिती; अलिशान हॉटेलमध्ये भरायचा दरबार, धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातील 1 हजार 450 कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंदमध्ये सहभाग

Blood Pressure: ही छोटी चूक ठरते BPसाठी घातक! पाणी कमी पिणाऱ्यांनी आत्ताच व्हा सावध, नाहीतर...

SCROLL FOR NEXT