Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या चर्चेत आहे.
तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैगिंक छळाचे आरोप केले आहेत.
आज आपण अभिनेत्री तनुश्री दत्ता कोण आहे हे जाणून घेऊया.
तनुश्री दत्ता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तनुश्री दत्ताचा जन्म १९ मार्च १९८४ मध्ये झारखंडच्या जमशेदपूर येथे झाला आहे.
तनुश्रीला लहानपणापासून मॉडेलिंगची आवड आहे. यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडलं.
२००४ मध्ये मिस इंडिया युनिव्हर्सच्या किताबावर तनुश्रीने तिचे नाव कोरले आहे.
तनुश्री दत्ताने चॉकलेट, आशिक बनवाया, रकीब, रिस्क, ढोल, गुड बॉय- बॅड बॉय या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.
तनुश्रीने मोजक्या चित्रपटात काम केले तरी ती कोट्यावधी संपत्तीची मालकीण आहे. माहितीनुसार, तनुश्री दत्ताची एकूण संपत्ती १० कोटी रूपये आहेत.