Sara Ali Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

सारा अली खानचा 'या' गाण्यावरचा भन्नाट डान्स पाहिलात का? व्हिडीओ तुफान व्हायरल

सारा अली खानने मी उत्तम डान्सर नसल्याचे अनेकदा सांगितले आहे. पण तरीही ती डान्स करण्याची संधी सोडत नाही.

कोमल दामुद्रे

मुंबई: अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूड स्टार्सपैकी एक आहे. साराने अल्पावधीतच दमदार अभिनयाने इडंस्ट्रीत खास ओळख निर्माण केली आहे. साराने अभिनयाने आणि तिच्या उत्कृष्ट शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सारा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. फोटो (Photo) आणि व्हिडीओच्या माध्यमातून सारा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. साराने नुकताच इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. जो सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.

अनेकदा सारा तिचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते.आता देखील साराने तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. साराने कॉफी घेण्यापूर्वीचा आणि नंतरचा असे तिचे दोन हावभाव दाखवले आहेत. कॉफी घेण्यापूर्वी सारा स्टुडिओमध्ये हेअरस्टायलिस्टबरोबर 'बाहों में चले आओ' या गाण्यावर ठेका धरताना दिसते आहे. पुढे कॉफी घेतल्यानंतर काही वेळातच सारा जया बच्चन यांच्या 'टिंकू जिया' गाण्यावर हेअरस्टायलिस्टबरोबर भन्नाट डान्स (Dance) करते आहे. साराचा हा स्वॅग तिच्या चाहत्यांना आवडला आहे. तिच्या या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

सारा अली खानने मी उत्तम डान्सर नसल्याचे अनेकदा सांगितले आहे. पण तरीही ती डान्स करण्याची संधी सोडत नाही. आतादेखील साराचा व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. सारा अली खान चित्रपटात असो किंवा सोशल मीडियावर, चाहते तिच्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. डान्सच्या या व्हिडिओवरही यूजर्स साराची कौतुक करायला थकत नाहीत. काहींनी तिच्या व्हिडीओवर क्यूट आणि फनी म्हटलं, तर काहींनी हार्ट इमोजीसह आपलं प्रेम दाखवलं आहे. पिवळ्या लेहेंगा-चोलीत सारा तिच्या सौंदर्याची झलक दाखवते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

SCROLL FOR NEXT