Force 3 saam tv
मनोरंजन बातम्या

Force 3 : अ‍ॅक्शनचा डबल डोस घेऊन येतोय 'फोर्स 3' ; जॉन अब्राहमसोबत झळकणार 'हा' सुपरस्टार, शूटिंग सेटवरील VIDEO समोर

Force 3 Movie Video : जॉन अब्राहमच्या 'फोर्स 3' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत आणखी एक बॉलिवूडचा सुपरस्टार झळकणार आहे. चित्रपटाबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'फोर्स' चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'फोर्स 3' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

जॉन अब्राहमसोबत चित्रपटात आणखी एक स्टार कलाकार दिसणार आहे.

बॉलिवूडचा ॲक्शन हिरो जॉन अब्राहम (John Abraham ) आता 'फोर्स 3' ( Force 3) चित्रटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या चित्रटात बॉलिवूडचा स्टार कलाकार झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून 'सनम तेरी कसम' फेम हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आहे. 'फोर्स 3'मध्ये जॉन अब्राहमसोबत हर्षवर्धन राणे झळकणार आहे, ज्यामुळे सिनेमात अ‍ॅक्शनचा डबल डोस पाहायला मिळणार आहे.

'फोर्स 3' चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री तान्या मानिकतला झळकणर आहे. नुकताच हर्षवर्धन राणेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात चित्रपटाच्या पारंपरिक मुहूर्त पूजा समारंभ पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये हर्षवर्धन शूटिंग सेटवर पूजा करताना दिसत आहे. तान्या माणिकतला देखील हात जोडून मागे उभी असल्याचे दिसून येत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "FORCE 3 आमच्यासोबत असो..."

'फोर्स 3' चे दिग्दर्शन भाव धुलिया आणि लेखन सिंहाब हाश्मी यांनी केले आहे. 'फोर्स 3'चे पहिले शेड्यूल गुजरातमध्ये होत आहे. 'फोर्स' फ्रँचायझीचा 'फोर्स 3' हा तिसरा भाग आहे. 'फोर्स' 2011 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर 'फोर्स 2' चित्रपट 2016 ला रिलीज झाला. आता 'फोर्स 3' चित्रपट 2027 ला रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम एसीपी यशवर्धनच्या भूमिकेत दिसणार आहे.

हर्षवर्धन राणे वर्कफ्रंट

अलिकडेच हर्षवर्धन राणे 'एक दीवाने की दीवानियत' या चित्रपटात झळकला आहे. ज्यात तो सोनम बाजवासोबत रोमँटिक अंदाजात दिसला. चाहते आता हर्षवर्धन राणेच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हर्षवर्धन राणे तरुणाईचा आवडता अभिनेता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime news India: बाप की सैतान! पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केली हत्या, पोलिसांकडून पित्याला अटक

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' नाही 'ही' स्पर्धक मारणार बाजी

Maharashtra News Live Update: राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजातील 34 मुली गायब; भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांचा गंभीर आरोप

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT