Harshad Chopda saam tv
मनोरंजन बातम्या

बिग बॉस 16 मध्ये दिसणार हर्षद; ये रिश्ता क्या कहलाता है' सोडणार?, चर्चेला उधाण

हर्षद चोप्रा 'बिग बॉस' च्या नव्या पर्वात दिसणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूडचा दंबग सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित रिअॅलिटी शो 'बिग बॉस' पुन्हा नव्या सीझनसह पुनरागमन करत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस' चा १६ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही अनेक सेलिब्रिटी या शोचा भाग असणार आहेत.

माहितीनुसार, हर्षद चोप्रा (Harshad Chopda)'बिग बॉस' च्या नव्या पर्वात दिसणार आहे. परंतु हर्षद सध्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका करत आहे. यामुळेच त्याच्या 'बिग बॉस' मध्ये येण्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मालिकेत हर्षद अभिमन्यूची व्यक्तिरेखा साकारत आहे. जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. यामुळेच अभिमन्यू 'बिग बॉस' शो करेल की नाही, याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहे. याचदरम्यान एक वृत्त समोर आले आहे. ज्याने चाहत्यांना धक्काच बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद बिग बॉससाठी 'ये रिश्ता क्या कहलाता है' ह्या मालिकेचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेतील अभिमन्यू या त्याच्या पात्राला तो कटांळला असल्याची माहिती समोर आली आहे. आता त्याला नव्या दमात सुरूवात करायची आहे. मात्र अद्यापही शोच्या निर्मात्याकडून याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेचा आगामी भाग खूप मजेशीर असणार आहे. अभिमन्यू आणि अक्षरा पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. अभिमन्यूला कुणालचे सत्य कळेल आणि त्यानंतर तो पुन्हा अक्षरासोबत एकत्र दिसेल. अशातच हर्षदने 'ये रिश्ता क्या कहलाता है' ह्या मालिकेला निरोप दिला तर निर्मात्यांना नवा चेहरा शोधावा लागेल. यामुळेच पुढे काय होणार आहे येत्या काही दिवसांतच कळणार आहे.

आतापर्यंत 'बिग बॉस' या शोसाठी फैजल खान, मुनव्वर फारुकी, कनिका मान, चारू असोपा, राजीव सेन, नुसरत भरूचा, फहमान खान अशी अनेक नावे समोर आली आहेत. मात्र, अद्याप यापैकी कोणाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अलीकडेच, शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. आगामी भाग खूपच रंजक असणार आहे. हे दिसून आले आहे.

आगामी भागात सलमान खान आणि त्यासोबत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सीझनची झलक दिसते आहे. प्रोमोमध्ये सलमान म्हणतो की, १५ वर्षांपासून बिग बॉसने सर्वांचा खेळ पाहिला आहे, मात्र यावेळी "'बिग बॉस' आपला खेळ दाखवेल. सकाळ होईल, तरी देखील चंद्रच आकाशात दिसेल. गुरुत्वाकर्षण हवेत होईल. घोड्याची चाल देखील सरळ असेल, सावलीही तीची साथ सोडेल कारण आता खरा खेळ सुरू होणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT