हरनाजच्या डोक्यावर सजलाय आजवरचा सर्वात महागडा ताज Saam Tv
मनोरंजन बातम्या

मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या डोक्यावर सजलाय आजवरचा सर्वात महागडा ताज, किंमत तब्बल

चंदीगड गर्ल हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) मिस युनिव्हर्सचा (Miss Universe 2021) किताब जिंकून भारताचा मान वाढवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : तब्बल 21 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिस युनिव्हर्सचा किताब अखेर पुन्हा भारताकडे आला आहे. चंदीगड गर्ल हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) मिस युनिव्हर्सचा (Miss Universe 2021) किताब जिंकून भारताचा मान वाढवला आहे. सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि लारा दत्ता (Lara Dutta) यांच्यानंतर हरनाज ही तिसरी भारतीय आहे जिने हा किताब पटकावला आहे. - Harnaaz Sandhu Won Miss Universe 2021 Title What Is The Cost Of Her Crown

हरनाजच्या डोक्यावर सजलेल्या ताजची किंमत किती?

मिस युनिव्हर्स (Miss Universe 2021) हा सर्वात प्रसिद्ध ब्युटी काँटेस्ट आहे. ही स्पर्धा प्रत्येक वर्षी होते आणि यामध्ये जगातील अनेक देशातील महिला भाग घेतात. ही स्पर्धा जिंकणाऱ्या महिलेला अनेक पुरस्कार मिळतात. पण, यापैकी सर्वात खास पुरस्कार म्हणजे तिच्या डोक्यावर सजणारा ताज (Miss Universe Crown), ज्याची प्रतिक्षा संपूर्ण जग करत असते. पण, मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या डोक्यावर सजलेल्या ताजची किंमत किती हे तुम्हाला माहितीये का?

मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या (Harnaaz Sandhu) डोक्यावर सजलेल्या ताजचं नाव मोआद मिस युनिव्हर्स क्राउन (Mouawad Miss Universe crown) आहे. कंपनीने त्यांच्या ऑफिशयल इंस्टाग्राम अकाउंटवर या ताजचा फोटो शेअर केला आहे.

फिलस्टारलाइफच्या रिपोर्टनुसार, या ताजची किंमत 5 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय. चलनात तब्बल 3.7 कोटी रुपयांहून अधिक आहे. या ताजला पावर ऑफ युनिटीचं प्रतिक मानलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार हा आतापर्यंतचा सर्वात महाग ताज आहे. यामध्ये 1,725 पांढऱ्या रंगाचे हिरे जडलेले आहेत, तर 3 गोल्डन कॅनरी हिरेही यावर लावण्यात आले आहेत.

21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा ताज भारताच्या नावे

तब्बल 21 वर्षांनंतर हा मिस युनिव्हर्सचा ताज हरनाजने भारतात परत आणला आहे. यावर्षी 12 डिसेंबरला इस्रायलच्या दक्षिणेकडील इलात शहरामध्ये 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. हरनाज संधू या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

SCROLL FOR NEXT