Hardik Pandya Worth Instagram
मनोरंजन बातम्या

Hardik - Natasa Divorce : घटस्फोटापूर्वी हार्दिक पांड्याने खेळला मोठा गेम, नताशाचा 'क्लीन बोल्ड'

Hardik Pandya Worth : घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक स्वत:च्या निर्णयाने त्याच्या संपत्तीतला ७० % हिस्सा नताशाला देणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

Chetan Bodke

क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच दोघांनीही घटस्फोट घेतल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर हार्दिक आणि नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून त्यांना ३ वर्षांचा मुलगा अगस्त्य हा आहे. घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या स्वत:च्या निर्णयाने त्याच्या संपत्तीतला ७० % हिस्सा नताशाला देणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. पण याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नुकताच याविषयीचे वृत्त 'अहमदाबाद मिरर'ने प्रसारित केले होते. या वृत्तानुसार, घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक स्वत:च्या निर्णयाने त्याच्या संपत्तीतला ७० % हिस्सा नताशाला देणार नाही. मिडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याच्या नावावर जेमतेम ९१ कोटींचीच संपत्ती आहे. पण या संपत्तीतही ५० % वाटा हार्दिकच्या आईला मिळणार आहे. हार्दिक पांड्याने आपल्या आईच्या नावावर मुंबई आणि वडोदऱ्यातील घर आणि काही लक्झरीयस कार्स सहित अनेक गोष्टी आईच्या नावावर आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका चॅट शोमध्ये हार्दिकने सांगितले होते की, त्याने त्याच्या एकूण संपत्तीतला हिस्सा वडील, भाऊ आणि आईला दिलेला आहे. त्यामधील ५० % संपत्तीचा वाटा आईच्या नावावर तर उर्वरित संपत्तीतला ५० % वाटा हा वडिल आणि भावाच्या नावावर आहे. आता जितकी उर्वरित प्रॉपर्टी आहे, त्यातूनच हिस्सा नताशाला तो देणार आहे. हार्दिकने त्याच्या उर्वरित संपत्तीतील ७० % नताशाला देण्याचे मान्य केले आहे. नताशावर मुलाची जबाबदारी आहे, त्याच्या देखभालीसाठी हार्दिकला पैसे द्यावे लागणार आहेत.

हार्दिकच्या फॅमिलीचा वाटा ९१ कोटींमध्ये आहे की, त्या व्यतिरिक्त वेगळ्या मालमत्तेमध्ये आहे, याविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. हार्दिकच्या संपत्तीतून नताशाला किती पैसे मिळतात अद्याप हे सुद्धा गुलदस्त्यात आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हार्दिकच्या ९१ कोटी रुपयांच्या मालमत्तेपैकी नताशाला जवळपास ६३ कोटी रुपयांचा हिस्सा मिळणार आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

SCROLL FOR NEXT