Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : हार्दिक पांड्याची एक्स वाइफ नताशाने बिग बॉसची ऑफर नाकारली, नेमकं कारण काय?

Natasa Stankovic : अलिकडेच भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची एक्स वाइफ नताशा बिग बॉस १८ मध्ये झळकणार याची चर्चा सुरू होती. आता नताशा बद्दल आणखी एक अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र बिग बॉस 18 ची चर्चा चालू आहे. कोणते चेहरे यामध्ये पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. बिग बॉसची प्रचंड क्रेझ आहे.

या शो मध्ये कोणते सेलिब्रिटी येणार यावरून अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अनेक नावे समोर देखील आली आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची एक्स वाइफ नताशा (Natasa Stankovic) देखील या शोचा भाग बनणार असल्याची चर्चा सुरू होती. तसेच ती एकटी नसून तिच्या सोबत तिचा मित्र अलेक्झांडर सोबत बिग बॉस घरात झळकणार होती.

नताशा बिग बॉसमध्ये (Bigg Boss 18) दिसणार यामुळे चाहते खूप खुश होते. कारण तिच्या बिग बॉसमध्ये येण्याने हार्दिक आणि तिच्या नात्यावर अनेक खुलासे झाले असते. तसेच तिच्या नवीन मित्रासोबतच नातं देखील कळू लागले असते.

आता मात्र नताशाने सलमानच्या शोची ऑफर नाकारली आहे, अशी चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नताशाने सलमान खानच्या (Salman Khan) शो बिग बॉस 18 मध्ये येण्यास नकार दिला आहे. याचे मुख्य कारण नताशा-हार्दिकचा मुलगा अगस्त्य आहे. नताशा सांगितले की, "माझा मुलगा अजून खूप लहान आहे आणि त्याला माझी गरज आहे त्यामुळे मी या शोची ऑफर नाकारली. " सध्या नताशाने कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही आहे. नताशा या आधी देखील बिग बॉस 8 चा भाग होती. तिने तो सीझन खूप गाजवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT