Harbhajan Singh Biopic Saam Tv
मनोरंजन बातम्या

Harbhajan Singh: हरभजन सिंहच्या बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता झळकणार; म्हणाला, 'तो माझ्यापेक्षा चांगला...'

Harbhajan Singh Biopic: भारताचा माजी क्रिकेटपटू ऑफ स्पिनर हरभजन सिंहने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यावर बायोपिक बनल्यास कोणत्या अभिनेत्याने त्याची भूमिका साकरावी हे स्पष्टपणे सांगितले आहे

Shruti Vilas Kadam

Harbhajan Singh Biopic: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि ऑफ स्पिनर हरभजन सिंहने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यावर बायोपिक बनल्यास कोणत्या अभिनेत्याने त्याची भूमिका साकरावी हे स्पष्टपणे सांगितले आहे. भज्जी म्हणाला की, विकी कौशल हा त्याच्या बायोपिकसाठी सर्वात योग्य अभिनेता आहे. त्याने विकीचे कौतुक करताना म्हटले की, "तो माझ्यापेक्षा चांगला दिसतो."

हरभजन सिंह म्हणाला, “जर माझ्यावर बायोपिक बनली, तर विकी कौशलने माझी भूमिका साकरावी. तो उत्तम अभिनेता आहे. तो पंजाबी आहे, म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्याची उंची थोडी जास्त आहे, पण मला वाटतं की तो माझ्यापेक्षा चांगला हरभजन साकारेल.”

विकी कौशलने यापूर्वी ‘सरदार उधम’, ‘सॅम बहादूर’ आणि ‘उरी’ यांसारख्या बायोपिक्समध्ये काम करून आपल्या अभिनय कौशल्याची छाप सोडली आहे. तसेच त्याने ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्यावर आधारित ‘छावा’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे बायोपिक चित्रपटांसाठी विकी कौशल हा एक उत्तम पर्याय आहे. चेहरा बनला आहे.

हरभजन याच्या जीवनातील अनेक पैलू आहेत. त्याचे क्रिकेटमधील यश, लढवय्या स्वभाव, त्यांची कुटुंबप्रेमी भूमिका आणि मैदानाबाहेरचे प्रसंग हे सर्व मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रोचक ठरेल. विकी कौशलसारखा परिपक्व अभिनेता ही भूमिका साकारल्यास, एक दर्जेदार आणि भावनिक चित्रपट साकारला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hadapsar Terminal: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हडपसरवरून धावणार ८ नवीन रेल्वे, कधीपासून होणार सुरू?

Success Story: पोलिस कॉन्स्टेबल असताना अपमान झाला, नोकरी सोडली, स्वाभिमानासाठी केली UPSC क्रॅक; उदय कृष्ण रेड्डी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

SCROLL FOR NEXT