har har mahadev , solapur, sambhaji brigade, mns saam tv
मनोरंजन बातम्या

Har Har Mahadev Explainer: 'हर हर महादेव'ला एवढा विरोध का होतोय? या ३ गोष्टी जास्त खटकल्या, वाचा सविस्तर

हर हर महादेव चित्रपटात इतिहास चुकीचा दाखवण्यात आल्याचा आरोप होतोय. त्यामुळं विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Har Har Mahadev Film : सध्या महाराष्ट्रात हर हर महादेव या चित्रपटावरून जोरदार गदारोळ सुरू आहे. थिएटर्समध्ये शो बंद पाडणे, पोस्टर उतरवणे, थिएटर्समध्ये प्रेक्षकांना धक्काबुक्की असे सगळे प्रकार घडत आहेत. चित्रपटात काही गोष्टी दाखवण्यात आल्यात त्या साफ चुकीच्या आहेत, असा दावा केला जात आहे. चित्रपटाचे शो बंद पाडले जात असताना, मनसेकडून पाठिंबा दिला जात आहे. त्यामुळं राजकीय वातावरणही तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हर हर महादेव या चित्रपटाला एवढा विरोध का होतोय, कोणत्या गोष्टी खटकल्या? याबाबत जाणून घेऊयात.

हर हर महादेव चित्रपटात इतिहास चुकीचा दाखवण्यात आल्याचा आरोप होतोय. त्यामुळं विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध करत, अनेक ठिकाणच्या चित्रपटगृहांमधील शो बंद पाडले आहेत. सुरुवातीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नोंदवलेल्या आक्षेपानंतर या चित्रपटाला अनेक संघटनांनी विरोध केला. महाराष्ट्रात या चित्रपटाविरोधात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँगेस, संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटना यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हर हर महादेव चित्रपटावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. काल ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली आणि शो देखील बंद करण्यात आला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहेच. आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ संभाजी राजेंची स्वराज्य संघटना सुद्धा आक्रमक झाली. नाशिक उपनगर परिसरातील आयनॉक्स थिएटरमध्ये स्वराज संघटनेनं आंदोलन केलं. पुण्यात संभाजी बिग्रेडने हर हर महादेव चित्रपटाचे पोस्टर उतरवले. सोलापुरातही या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र हर हर महादेव चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. पण त्याचवेळी पक्षाने कोणतीही भूमिका जाहीर करू नये, त्याबाबत दिग्दर्शक बोलतील, असे आदेशच पक्षप्रमुखांकडून आले आहेत. (Movie)

विरोध कशामुळे?

हर हर महादेव या चित्रपटामधून इतिहासाची मोडतोड केलीय असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याचे अमोल मिटकरींनी म्हटलंय. या चित्रपटांमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये वाद झाल्याचं दाखवलं आहे, असा दावा केला जात आहे. तसेच या चित्रपटामध्ये जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सोयराबाई यांचा एकेरी उल्लेख केल्याचे दाखवण्यात आला आहे, असाही दावा केला जात आहे. त्यामुळं यातून चुकीचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न जाणूनबुजून करत असल्याचा आरोप होत आहे. (Political)

या सगळ्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. 'सेन्सॉर बोर्डाने देखील आम्हाला तेच प्रश्न विचारले आहेत, ज्यावर तुम्ही आक्षेप घेत आहेत. आम्ही सेन्सॉर बोर्डला योग्य ते पुरावे आणि दस्तावेज सादर केले आहेत. त्यानंतरच आम्हाला प्रमाणपत्र मिळाले आहे. तुम्ही चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांना मारहाण करता, त्यांना शिवीगाळ करता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान आहे. त्यासाठी असे करणाऱ्यांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागितली पाहिजे. तुम्हाला चित्रपटातील एकदा भाग आवडला नसल्यास त्यावर पण कोर्टात बोलू, असे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT