4 ऑगस्ट 2024 हा दिवस यंदा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जाणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र किंवा मैत्रीण असते ज्याबरोबर आपण सर्व काही गोष्टी शेअर करु शकतो. या मैत्रीचं नातं साजरं करण्याचा हा दिवस! जशी रक्ताची नाती महत्त्वाची असतात तसाच आयुष्यात एक मित्र असणेही तितकेच गरजेचे असते. आयुष्याच्या वेगवगेळ्या वळणावर मित्र साथ देतात आणि प्रवास सुखकर करण्यासाठी मदत करतात. अशाच मैत्रीच्या नात्यांचा उलघडा करणारे, मैत्रीचं महत्त्व सांगणारे बॉलिवूडमधील 10 सिनेमांची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत....
ये जवानी है दिवानी - Yeh Jawaani Hai Deewani
ये जवानी है दिवानी अर्थात YJHD ही चार मित्रांची एक हृदयस्पर्शी कथा आहे. ट्रेकिंगच्या सहलीवर मैत्री होते आणि त्याचं रुपांतर आयुष्यभराच्या मैत्रीत होतं. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपट 30 मे 2013 ला रिलिज झाला होता आणि यंदा या सिनेमाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. या सिनेमातील गाणीही खास लोकप्रिय आहेत.
जिंदगी ना मिलेगी दुबारा (Zindagi Na Milegi Dobara)
बॅचलर्स पार्टीसाठी तीन लहानपणीचे मित्र जाता आणि आयुष्यभराच्या आठवणींचा खजिना आपल्यासोबत घेऊन येतात. अशी या सिनेमाची कहाणी आहे. या सुपरहिट सिनेमाला यंदा 13 वर्ष पुर्ण झाली आहेत. सिनेमात हृतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर, कतरिना कैफ, कल्की कोचलिन अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. फरहानची बहिण झोया अख्तर हिने सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. मजा, मस्ती, सहल आणि मैत्री या थीमवर आधारीत पाहावाच असा हा सिनेमा आहे.
थ्री इडियट्स - 3 Idiots
कॉलेजचे दिवस हे कायमच आनंददायी असतात. कारण, कॉलेजच्या दिवसांमध्ये शिक्षण घेण्यासोबत मज्जा असते ती मित्र-मैत्रिणींसह जगण्याची! याचीच कथा थ्री इडियट्समध्ये पाहायला मिळते. फरहान, राजू आणि रँचो यांच्यातील नॉस्टॅल्जिक बॉन्डमध्ये आपणही हरवून जातो. त्यांच्या कॉलेजमधील दिवसांनी त्यांचे जीवन कसे घडवले ते पाहायला मिळते. राजकुमार हिरानी या दिग्गज दिग्दर्शकांच्या या सिनेमाला भरपूर लोकप्रियता मिळाली.
सोनू की टिट्टू की स्विटी (Sonu Ke Titu Ki Sweety)
मैत्रीच्या धाग्यांची वीण घट्ट करणारा 'सोनू की टिट्टू की स्विटी' हा सिनेमा आहे. आजच्या तरुणाईच्या मैत्रीची व्याख्या हुबेहुब सांगणारा असा हा सिनेमा आहे. भरपूर कॉमेडी आणि तरीही भावूक करुन डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा एकदा तरी पाहावाच. थिरकायला लावणारी गाणी आणि पंच असलेले संवाद याचं उत्तम असणारा हा सिनेमा आहे.
दिल चाहता है (Dil Chahta Hai)
'दिल चाहता है' या सिनेमाविषयी न ऐकलेला कदाचितच कुणी व्यक्ती भारतात शोधून सापडेल. दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेला तरी आजही चाहत्यांच्या मनात घर केलेला 'दिल चाहता है' हा सिनेमा आहे. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा प्रंचड गाजला. विशेष म्हणजे यातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
छिछोरे (Chhichhore)
कॉलेजमधील दिवस आठवणीत राहतात त्याचे मुख्य कारण म्हणजे मित्र-मैत्रिणी. आणि त्याच क़ॉलेजच्या दिवसांमधील आठवणीत घेऊन जाणारा सिनेमा म्हणजे छिछोरे. या सिनेमात कॉमेडीसह सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. मैत्रीविषयीची कथा असूनही एक वेगळा अंदाज यामध्ये पाहायला मिळतो. सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकले. वरुण शर्मा, सहर्ष शुक्ला, रोहित चौहान, ताहिर राज भसीन, नवीन पॉलशेट्टी, तुषार पांडे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते.
वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding)
चार मैत्रिणींची गोष्ट असणारा ‘वीरे दी वेडिंग’ मेत्रीची नवी व्याख्या आपल्याला सांगते. चौघी अगदी शाळेपासून जीवलग मैत्रिणी आहेत. प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी आहे, प्रत्येकीचं आयुष्य वेगळं आहे आणि करिअरच्या वाटाही वेगळ्या आहेत. मात्र, मैत्रीच्या धाग्याने त्यांना एकत्र बांधून ठेवले आहे.
रॉक ऑन (Rock On!!)
१५ वर्षांपूर्वी रिलिज झालेला रॉक ऑन हा सिनेमा म्युझिक बँड आणि त्याच्या सदस्यांचा प्रवास दाखवतो. चित्रपटाच्या यशात गाण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिनेमाची गाणी आजही तितकीच हवीहवीशी वाटतात. हा सिनेमा एक म्युझिकल ड्रामा आहे. अभिषेक कपूर यांचं दिग्दर्शन आणि फरहान अख्तर यांनी निर्मिती केली आहे. तर, शकंर-एहसान-लॉय यांनी संगीत दिले आहे.
फुकरे (Fukrey)
दिल्लीतील तरुणांच्या अवती-भोवती फिरणारा फुकरे हा सिनेमा आहे. चार मित्रांची ही कथा आहे. २०१३ मध्ये रिलिज झालेला फुकरे कॉमेडी सिनेमा आहे. हा सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर फुकरे रिर्टन्स आणि फुकरे-३ हा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला.
काय पो छे (Kai Po Che)
दिग्दर्शक अभिषेक कपूरने तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन काय पो छे हा सिनेमा तयार केला आहे. मैत्रीसोबतच तरुणाईला प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे. 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या चेतन भगतच्या बेस्ट सेलर कादंबरीवर आधारीत सिनेमा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.