HBD Tabu Saam Tv
मनोरंजन बातम्या

HBD Tabu: 52 वर्षीय तब्बूचं अजूनही लग्न झालं नाही, नेमकं काय आहे कारण?

Happy Birthday Tabu: तब्बू नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Happy Birthday Tabu:

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू 4 नोव्हेंबरला आपला 52वा वाढदिवस साजरा करत आहे. तब्बू नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. तब्बूने बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ नाव कमावलं आहे. त्याचसोबत त्ब्बूने काही हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. तब्बूचे संपूर्ण नाव तब्बस्सुम फातिम हाश्मी असे आहे. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी झाला.

तब्बू ही नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत असते. परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमी उत्सुकता असते. 52 वर्षीय तब्बूने अजून लग्न का केले नाही असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो.

तब्बू अनेकदा तिच्या अफेअर्समुळे चर्चेत होती. तब्बूचे साजिद नाडियालवाला, नागार्जुन, संजय कपूसोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. संजय कपूर आणि तब्बूचे नाते फार कमी काळ टिकले. त्यानंतर तब्बू दिग्दर्शक साजिद नाडियालवालासोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु काही कारणांनी त्यांच्यातील नाते टिकले नाही. त्यानंतर तब्बू आणि साउथ सुपस्टार नागार्जुन यांचे अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी नागार्जुन यांचे लग्न झाले होते. परंतु या दोघांनीही कधीच त्यांचे नाते सर्वांसमोर जाहीर केले नाही. या नात्यानंतर तब्बूने कधीच अफेअर किंवा लग्न केले नाही.

दहाव्या वर्षी अभिनयाला सुरुवात

तब्बूने वयाच्या दहाव्या वर्षी पहिल्यांदा बालकलाकार म्हणून सुरुवात केली. तब्बूने स्मिता पाटील यांच्या 'बाजार' चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने देव आनंद यांच्या 'हम नौजवानट या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर तब्बूने कधीच मागे वळून पाहिले नाही. तब्बूला खरी ओळख तेलुगु चित्रपट 'कुली नंबर 1' मधून मिळाली.

तब्बू-शबाना आझमी यांचे खास नाते

तब्बू ही हाश्मी-आझमी कुटुंबातील सदस्य आहे. तब्बू शबाना आझमी यांची भाची आहे. इंडस्ट्रीतील लोकप्रिय कुटुंबात जन्मलेली असून तब्बूला कदीच चित्रपटसृष्टीत काम करायचे नव्हते. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, 'फिल्मी बॅकग्रांउड असूनही मी कधी अभिनेत्री होईल असं मला वाटलं नव्हतं. मला चित्रपट पाहायलाही फारसं आवडत नव्हतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

Grapes Cleaning: तुम्ही द्राक्षे धुवून लगेच खाताय का? व्यवस्थित स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

SCROLL FOR NEXT