Preity Zinta Photos Instagram/ @realpz
मनोरंजन बातम्या

Preity Zinta: प्रीतीचे 'अनसिन फोटो', फोटो पाहून चाहतेही भाळले...

नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदाजाने प्रीती चाहत्यांसोबत खास फोटो शेअर करत असते.

Chetan Bodke

Preity Zinta: बॉलिवूडची बबली गर्ल आणि ब्युटी क्वीन अभिनेत्री प्रीती झिंटा आज ४८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शाहरुख खान आणि मनिष कोईरालासोबत १९९८ मध्ये 'दिल से' चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करत चाहत्यांच्या मनावर राज्य केले. नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदाजाने प्रीती चाहत्यांसोबत खास फोटो शेअर करत असते. सोबतच प्रीती आपल्या फॅशनने देखील चाहत्यांवर भुरळ पाडते. तिच्या खास अंदाजातील फोटो आज आपण पाहणार आहोत.

एक यशस्वी अभिनेत्री, उद्योजिका, स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत नेहमीच अग्रस्थानी राहणारी प्रीती आजही आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. बॉलिवूडची सौंदर्यवती आज 48 वर्षांची होत असून आपण तिचे कधीही न पाहिलेले लूक पाहणार आहे. प्रीती अनेक दिवसांपासून चित्रपटात दिसलेली नाही, प्रीती नेहमीच रेड कार्पेटवर आपल्या खास अंदाजात फोटो अनेकदा क्लिक करत असते. प्रीतीने एकदा आयफा अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर मेटॅलिक गोल्ड गाउन परिधान करत खास अवतारात फोटो क्लिक केले होते.

सोबतच आणखी एक प्रीतीचा रेड कलरचा लूक चांगलाच व्हायरल झाला होता.

नेहमीच वेस्टर्न लूकमध्ये दिसणाऱ्या प्रीतीचा ड्रेसमधील लूकदेखील चांगलाच व्हायरल होत होता. त्यात ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती.

प्रीतीच्या स्टायलिश लूकमध्ये ब्लॅक लेटेक्स जॅकेट, स्किन-फिट डेनिम आणि ब्लॅक बूट घातलेला फोटो शेअर केला होता. तिचा जॅकेटवरील डॅशिंग लूक पाहुन चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला होता.

प्रीतीने स्कीनी लेटेक्स पँट आणि पिवळ्या रंगाचे स्लीव्हलेस टॉप घालत खास फोटोशूट केले होते. सोबतच तिच्या ब्लॅक शूजने ही सर्वांचेच लक्ष वेधले.

1998 मध्ये बॉबी देओल-स्टारर 'सोल्जर' मध्ये तिच्या खास अभिनयाने सर्वांनाच अचंबित केले होते. प्रीतीने 2000 च्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये सर्वात प्रभावशाली आघाडीच्या महिलांपैकी एक म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. 'चोरी चोरी चुपके चुपके', 'दिल चाहता है', 'कल हो ना हो', 'कोई मिल गया', 'वीर झारा' आणि 'सलाम नमस्ते' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रीतीकडे एक प्रभावी महिला म्हणून पाहिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT