Kriti Sanon Birthday Instagram
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Kriti Sanon : पहिल्याच रॅम्पवॉकवेळी नको ते घडलं, २० मॉडेलसमोरच खावा लागलेला ओरडा; क्रिती सेननने साऊथमधून केलं पदार्पण!

Kriti Sanon Struggle Story : बॉलिवूडची परमसुंदरी म्हणून अवघ्या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री क्रिती सेनन. २७ जुलैला अर्थात आज क्रिती सेननचा ३४वा वाढदिवस आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडची परमसुंदरी म्हणून अवघ्या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री क्रिती सेनन. आज(२७ जुलै) क्रिती सेननचा ३४वा वाढदिवस साजरा आहे.

क्रितीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्लीत झाला. कुटुंबामध्ये फिल्म इंडस्ट्री संबंधित दुर दुरचा संबंध नसतानाही क्रिती सेनन आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रितीने तिच्या दमदार अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

क्रिती सेननला तिच्या अभिनयासोबतच स्टाईलसाठीही चांगलीच पसंती मिळते. ‘हिरोपंती’ चित्रपटातून क्रितीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. पण ती त्या चित्रपटाआधीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होती. क्रितीचे वडील सीए आहेत. तर तिची आई प्राध्यापिका आहेत. क्रितीने पूर्वी इंजिनियरच शिक्षण घेतले होते. शिवाय, ती प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आहे. त्यासोबतच क्रिती राज्यस्तरीय बॉक्सर देखील आहे. पण, नंतर तिने अचानक फिल्मी दुनियेत एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.

क्रितीने टॉलिवूड इंडस्ट्रीतून डेब्यू केले होते. तिचा पहिला चित्रपट सुपरस्टार महेश बाबुसोबत 'नेनोक्कडाइन' हा चित्रपट होता. पण तिला या चित्रपटातून म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर क्रिती सेनन शब्बीर खान दिग्दर्शित 'हिरोपंती' चित्रपटात टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर केली. ह्या चित्रपटातून क्रितीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. या चित्रपटामुळे क्रितीला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर आजवर तिने केव्हाच मागे वळून पाहिले नाही. क्रितीने करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली होती.

क्रितीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते, तिच्या पहिल्या रॅम्प वॉकमध्ये तिच्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्यामुळे तिला २० मॉडेलसमोर कोरिओग्राफर प्रचंड भडकला होता. कोरियोग्राफीमध्ये काही चुका झाल्यामुळे तिला ओरडा खावा लागला होता. त्यावेळी अभिनेत्री चक्क रॅम्पवरच रडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT