Hansika Motwani-Sohael Kathuria SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hansika Motwani-Sohael Kathuria : मैत्रिणीच्या नवऱ्याशी केलं लग्न, ३ वर्षांतच अभिनेत्रीवर आली घटस्फोटाची वेळ

Hansika Motwani-Sohael Kathuria Divorce : बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

हंसिका मोटवानीने आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याशी लग्नगाठ बांधली.

हंसिका मोटवानी-सोहेल खाटूरिया लग्नाच्या 3 वर्षांनी घटस्फोट घेणार आहेत.

मनोरंजनसृष्टीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्याचा लवकरच घटस्फोट होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीने (Hansika Motwani) 3 वर्षांपूर्वी उद्योगपती सोहेल खाटूरियाशी लग्नगाठ बांधली आहे. आता यांच्या नात्यात तणाव असल्याची चर्चा सुरू आहे. हंसिका मोटवानीने सोहेल खाटूरियाशी (Sohael Kathuria) 4 डिसेंबर 2022 रोजी लग्न केले. यांचा जयपूरमध्ये शाही पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

हंसिका मोटवानी आणि सोहेल खाटूरिया लग्नाच्या 3 वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याचे बोले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, खूप वेळापासून हंसिका मोटवानी आणि सोहेल खाटूरिया वेगळे राहत आहेत. हंसिका आईसोबत राहत आहे. हंसिका मोटवानी आणि सोहेल खाटूरिया सध्या खूप मतभेद चालू आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. हंसिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सोहेल खाटूरियाने मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत घटस्फोटाची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. मात्र तो आणि हंसिका एकत्र राहत नाही यावर कोणतेही स्पष्टीकरण त्याने दिले नाही. दुसरीकडे हंसिका मोटवानीने नवऱ्यासोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून हटवले आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. हंसिका मोटवानीने बॉलिवूडसोबतच साऊथ इंडस्ट्री देखील गाजवली आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

हंसिका मोटवानी-सोहेल खाटूरिया लव्हस्टोरी

हंसिका मोटवानी ही सोहेल खाटूरियाची दुसरी बायको आहे. सोहेलची पहिली पत्नी हंसिकाची चांगली मैत्रीण होती. सोहेल खाटूरियाच्या पहिल्या बायकोचे नाव रिंकी बजाज आहे. हंसिका मोटवानीने आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबतच संसार थाटला आहे. यामुळे त्यांच्या नात्यावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. तसेच त्यांना ट्रोल देखील केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये भाजप-अजितदादा गटाची युती होणार?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

Pune : पुण्यात खळबळ! शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा, कारण काय?

SCROLL FOR NEXT