Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: फिलिंग आता है ना मॅन...'मर्डर गर्ल'ला पाहून सदावर्तेंची बत्ती गुल

Gunaratna Sadavarte: बिग बॉसच्या घरात 'वीकेंड का वार'ला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात मल्लिका शेरावतही आली होती. तेव्हा गुणरत्न सदावर्ते यांनी मल्लिका शेरावतसोबत संवाद साधला.

Shreya Maskar

बिग बॉसच्या (Bigg Boss 18) घरात सध्या गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची हवा पाहायला मिळत आहे. पर्वाच्या पहिल्या दिवसापासून सदावर्ते यांनी आपल्या वक्तव्याने घरात राडा घातला आहे. सदावर्ते यांची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली आहे. बिग बॉस 18चा पहिला 'वीकेंड का वार' पार पडला आहे. त्यात घरात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

'वीकेंड का वार'ला स्पेशल 'मर्डर गर्ल' म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत बिग बॉसच्या घरात आली होती. ती घरामध्ये देखील गेली होती. घरातल्या सदस्यांसोबत ती संवाद साधला. मल्लिकाच्या (Mallika Sherawat) दिलखेचक अदांनी गुणरत्न सदावर्तेही फिदा झालेले पाहायला मिळाले. त्यांनी मल्लिकासोबत भन्नाट संवाद देखील साधला आहे.

बिग बॉसच्या प्रोमोमध्ये गुणरत्न सदावर्ते हे लाजताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करण वीर सदावर्तेंना म्हणतो की, "मल्लिकाला बघून सदावर्ते सरांना आनंद झाला", असे बोलल्यावर गुणरत्न सदावर्ते हे लाजताना पाहायला मिळत आहेत. त्यावर गुणरत्न सदावर्ते हे बोले की, "अलगही फिलिंग आता हे ना मॅन..."सदावर्ते यांना मल्लिकाचा ड्रेस खूप जास्त आवडला आहे. यावर सदावर्ते म्हणतात की, "हा ड्रेस मी डिजाईन करून घेणार" संपूर्ण घरात सदावर्ते "Hot Hot Hot" असे मोठ्याने बोलताना पाहायला मिळाले. त्यावर विवियन सदावर्ते यांना म्हणतो की, "जयश्री वहिनी तुम्हाला तव्यावर हॉट कोल्ड करेल" हे ऐकून घरातील सर्व सदस्य हसू लागतात.

गुणरत्न सदावर्ते हे मल्लिकाचा हात हातात घेत असल्याचे देखील व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तसेच मल्लिका देखील घरात डान्स करताना पाहायला मिळत आहे. आता या आठवड्यात घरातून कोण नॉमिनेट होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

SCROLL FOR NEXT