Gunaratna Sadavarte  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची अचानक शोमधून एक्झिट, बिग बॉसच्या घराबाहेर पडताच म्हणाले...

Bigg Boss 18 : 'बिग बॉस 18' मधून गुणरत्न सदावर्ते यांची एक्झिट झाली आहे. घराबाहेर पडल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉस 18 ची (Bigg Boss 18) सर्वत्र दमदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. सीझनच्या पहिल्या एपिसोडपासून गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या वक्तव्यामुळे घरात राडा घातला आहे. मात्र त्यांची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

एका आठवड्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte ) यांना बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. यामुळे त्यांचा चाहता वर्ग देखील नाराज आहे. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

एका मिडिया मुलाखतीत गुणरत्न सदावर्तेंनी म्हणाले की, "मी रील स्टार नाही तर रिअल स्टार आहे. कारण या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. बिग बॉसच्या घरात टॅलेंटेड कलाकार आहे आणि मी त्यांचा आदर करतो. मी सिनेसृष्टीत नाही तरी माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे मला लोकांचे प्रेम मिळत आहे. मी ज्या पद्धतीने बोलतो हे लोकांना खूप आवडतं. कारण ये पब्लिक है ये सब जानती है".

बिग बॉसच्या घरातून का बाहेर पडलात या बद्दल बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, मला कोर्टाची नोटीस मिळाल्यामुळे बिग बॉसचा शो सोडावा लागला. कारण कानून के हाथ बडे लंबे होते है...मला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आले नाही आहे. मराठा आरक्षणा संदर्भातील याचिकेमुळे मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलो आहे. ही खूप महत्त्वाची केस केस आहे. माझी पत्नी जयश्री याचा 2014 पासून याचा लढा देत आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT