'गुलाबो सिताबो फेम' ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन
'गुलाबो सिताबो फेम' ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन Saam Tv News
मनोरंजन बातम्या

'गुलाबो सिताबो फेम' ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे नातू शाज अहमद यांनी ही माहिती दिली आहे. अहमद यांनी सांगितले की, शुक्रवारी फारूख जफर यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ('Gulabo Sitabo Fame' veteran actress farrukh jaffar has died at the age of 88)

हे देखील पहा -

त्यांनी ट्विट केले, 'माझी आजी आणि स्वातंत्र्य सेनानी माजी MLC ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे आज संध्याकाळी ७ वाजता लखनऊमध्ये निधन झाले. फारूख काही काळापूर्वी गुलाबो सीताबो चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसल्या होता. या चित्रपटात त्यांनी फातिमा बेगमची भूमिका साकारली होती.

फारूख जफर यांचा जन्म १९३३ मध्ये जौनपूरच्या एका जमीनदार कुटुंबात झाला. त्यांनी नंतर पत्रकार आणि स्वातंत्र्य सेनानी असलेले सय्यद मोहम्मद जफर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर, त्या वयाच्या १६ व्या वर्षी लखनऊला गेल्या. सय्यद मोहम्मद जफर यांनी फारुख यांना पुढील अभ्यास करण्यासाठी आणि नंतर थिएटर तसेच चित्रपटांत काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. फारुख जफर यांनी लखनऊ विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि ऑल इंडिया रेडिओमध्येही काम केले होते.

फारूख जफर यांनी १९८१ मध्ये उमराव जान या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी रेखाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी स्वदेश या दुसऱ्या चित्रपटात काम केले. मग त्या पीपली लाईव्ह, चक्रव्यूह, सुलतान आणि तनु वेड्स मनु अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकल्या. २०१९ मध्ये त्यांनी 'अम्मा की बोली' मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. गुलाबो सिताबोसह डझनभर चित्रपटांमध्ये काम केलेल्या फारूख जफर यांना वयाच्या ८८ व्या वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. फारुख जफर यांचे मेहरुन्निसा, रक्स, कुंदन, नंदी हे लघुपट अद्याप प्रदर्शित व्हायचे बाकी आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anuj Thapar : अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल आला समोर, कुटुंबीयांनी केली सीबीआय चौकशीची मागणी, नेमकं कारण काय ?

Onion Export News Today: 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला बसला धक्का

Loksabha Election: ब्रेकिंग! सूरत, इंदुरनंतर ओडिसामध्ये मोठा गेम; काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार

Vishal Pawar Case Update | विशाल पवार मृत्यूप्रकरणाला नवं वळण

SCROLL FOR NEXT