भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाचा (Team India) पुढील प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शवली आहे. एएनआय ने दिलेल्या एका अहवालानुसार, बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Saurabh Ganguly) यासाठी द्रविडला राजी केले आहे. अहवालानुसार, गांगुली आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी द्रविडसोबत दुबईत बैठक घेतली आणि यूएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर त्याला भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी राजी केले. द्रविडसोबत दोन वर्षांचा करार करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. द्रविडला 10 कोटी रुपये पगार मिळणार आहे. माध्यमांच्या माहितीनुसार राहुल द्रविडने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्याचे मान्य केले आहे.
रवी शास्त्रींना मिळणारे वेतन - 5.5 कोटी + बोनस
राहुल द्रविडला मिळणार एवढे वेतन - 10 कोटी + बोनस
आयपीएलच्या अंतीम सामन्यानंतर शुक्रवारी रात्री बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, “द्रविडने प्रशिक्षक पदासाठी होय म्हटले आहे. तो भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असणार आहे. तो लवकरच एनसीएच्या प्रमुखपदावरून पायउतार होईल. ” वृत्तानुसार, द्रविडचा विश्वासू सहकारी पारस म्हांब्रेला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विक्रम राठोड संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहतील. यूएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा एकदा न्यूझीलंड दौऱ्यावर जायचे आहे. किवी संघ नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियासोबत 3 सामन्यांची टी 20 मालिका आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी टी -20 विश्वचषकानंतर आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा संपूर्ण कोचिंग स्टाफ रवी शास्त्रींसोबत राजीनामा देणार आहे. भारतीय संघाच्या सध्याच्या टॅलेंट पूलचे श्रेय राहुल द्रविडला जाते. 2016 ते 2019 पर्यंत ते इंडिया अ आणि 19 वर्षांखालील संघांचे मुख्य प्रशिक्षक होते. या दरम्यान, अनुभवी क्रिकेटपटूने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांच्या प्रतिभेला जोपासले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.