Sridevi Google Doodle On Sridevi 60th Birth Anniversary Twitter
मनोरंजन बातम्या

Sridevi Doodle News: श्रीदेवीच्या आठवणीत गुगलही रमलं; डुडलमधून दाखवली चित्रपटांची खास झलक

Google Doodle Today : बॉलिवूडची मोस्ट ब्युटीफुल अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रीदेवी यांची आज जयंती. जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल बनवत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिली आहे.

Chetan Bodke

Sridevi Google Doodle On Sridevi 60th Birth Anniversary: गुगल नेहमीच दिग्गजांना डुडलच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात. अशातच बॉलिवूडची मोस्ट ब्युटीफुल अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रीदेवी यांना देखील ६० व्या वाढदिवसानिमित्त वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत.

श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी मद्रासच्या मीनापट्टी येथे जन्म झाला. अभिनेत्रीने आपल्या सदाबहार सौंदर्याने एक काळ बॉलिवूडवर निर्विवाद राज्य केले होते. अभिनेत्री आज जरी आपल्यामध्ये नसली तरी, तिच्या अनेक आठवणी तिच्या चाहत्यांसोबत कायम आहेत.

अभिनेत्री दुबईमध्ये २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये एका खासगी कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. अभिनेत्रीच्या आज वाढदिवसानिमित्त गुगलने तिला अभिवादन केले आहे.

अभिनेत्रीचं खरं नाव श्रीदेवी नसून श्री अम्मा यांगार अय्यपन असे होते. पण तिला तिच्या खऱ्या नावाने नाही तर, श्रीदेवी या नावानेच जगभर ओळख प्राप्त झाली होती. श्रीदेवीने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, टॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील तामिळ, तेलुगू, मल्याळम भाषेतील चित्रपटात त्यांनी अनेक प्रमुख भूमिका साकारली होती.

अभिनेत्री श्री देवीचा आज ६० वा वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त, गुगलच्या सर्च इंजिनवर श्रीदेवीचा फोटो लावत त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. डुडलमध्ये अभिनेत्री श्रीदेवी डान्स करताना असून, फोटोमध्ये तिच्या आजूबाजूला तिच्या अनेक महत्वाच्या भूमिकांची झलक आपल्याला झलक पाहायला मिळते. सोबतच, तिच्या नागिन या सुपरहिट चित्रपटातील पोजही पाहायला मिळत आहेत.

ज्यावेळी समाजात पुरूष प्रधान संस्कृतीचा विशेष पगडा होता, त्यावेळी श्रीदेवीने आपल्या अभिनयाचा आणि सौंदर्याच्या जोरावर तिने स्वत:चे स्थान निर्माण केले होते. श्रीदेवी आपल्या सिनेकारकिर्दित एका चित्रपटासाठी १ कोटी इतकं मानधन आकारायची. १९७९ मध्ये श्रीदेवी यांनी ‘सिक्स्टीन सावन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. पण त्यांचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्यांचा पुढील चित्रपट १९८३ मध्ये आला होता. त्यावेळी श्रीदेवी यांनी ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून पुन्हा एकदा दमदार आगमन केलं. त्या चित्रपटापासून त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट, उत्तम आशयाचे चित्रपट दिले. श्रीदेवी यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दित ३०० चित्रपटांमध्ये काम केलं.

२००० च्या दशकात श्रीदेवी बॉलिवूडपासून दूर होती. तिने जवळपास १५ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर २०१३ मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यानंतर श्रीदेवीने २०१८ मध्ये मॉम चित्रपटातून चाहत्यांचे मन जिंकले. वयाच्या ५४ व्या वर्षांपर्यंत श्रीदेवीने ३०० कोटींची संपत्ती जमा केली. ३ आलिशान घरं, ७ लक्झरिय कार, मोठमोठ्या ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर देखील होती. अभिनेत्रीच्या निधनामुळे बॉलिवूडमध्येच नाही तर, अवघी भारतीय सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली होती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT