Good News! राज्यात आता तमाशासह अनेक लोककलांना परवानगी... Saam TV
मनोरंजन बातम्या

Good News! राज्यात आता तमाशासह अनेक लोककलांना परवानगी...

कोरोनामुळे तमाशा, शाहिरी, भारुड या लोककलांना कार्यक्रम सादर करण्यास परवानगी नव्हती, मात्र आता या लोककलावंतांना आपली कला सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: देशासह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याने जवळपास सर्वकाही अनलॉक झाले आहे. सिनेमागृहे (Cinema Hall), नाट्यगृहे (Theaters) खुली झाल्याने मनोरंजन (entertainment) क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला होता. आता लोककला जपणाऱ्या लोककलावंतांनाही (Lokkalavant) सरकारने आपली कला सादर करण्याची परवानगी देत दिलासा दिला आहे. राज्यात संस्कृतिक कार्यक्रम आणि लोककलांना मोकळ्या जागेत कार्यक्रम करण्यास आता परवानगी देण्यात आली आहे, मात्र कोरोनाच्या नियम आणि अटींचे पुर्णतः पालन करुनच एखादा कार्यक्रम आयोजित करता येणार आहे. (Good News! Many folk arts including Tamasha are now allowed in the state)

हे देखील पहा -

कोरोनामुळे तमाशा (Tamasha), शाहिरी, भारुड या लोककलांना कार्यक्रम सादर करण्यास परवानगी नव्हती. तमाशा लोककलावंत परिषदेने शासनाकडे याबाबत मागणी केली होती. या अनुषंगाने बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला सादर करण्यास राज्यसरकारने परवानगी देत याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ह्यात तमाशा, दशाअवतार, भारुड, शाहीर इत्यादी क्रयक्रमांसह टुरिंग टॉकिजलाही परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, मात्र कोरोनाची अटींचे पालन करण्याचे बंधनकारक असणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT