Bollywood Celebs Saam Tv
मनोरंजन बातम्या

Year Ender 2022: 'हार्ट'ब्रेकिंग न्यूज, वर्षभरात या सेलिब्रिटींवर काळाचा घाला...

2022 या वर्षात अनेक सेलिब्रिटींचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला आहे. विशेषत: जिममध्ये वर्कआउट करताना अनेकांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

Chetan Bodke

2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. या वर्षात अनेक सेलिब्रिटींचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला आहे. विशेषत: जिममध्ये वर्कआउट करताना अनेकांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला.

raju srivastava critical Know About his Health condition

राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav)

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना अनेक दिवस दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याच्या बातम्या वेळोवेळी येत होत्या, पण जीवनाच्या लढाईत ते हरले आणि ४२ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर राजू श्रीवास्तव त्यांचे निधन झाले.

kk's last journey begins

सिंगर केके (Singer KK)

31 मे 2022 रोजी गायक के.के.चेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. केके लाइव्ह शो करत असताना थोडे छातीत दुखु लागले. हॉटेलच्या खोलीत जाताच अचानक बेडवर कोसळला. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तिथेच मृत घोषित केले.

Tabassum

तबस्सुम (Tabassum)

18 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुमला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 78 वर्षीय तबस्सुम निरोगी होत्या. त्यांच्या मालिकेचे 10 दिवस शुटदेखील त्यांनी केले होते. पुढील आठवड्यातही त्या पुन्हा एकदा शूट करणार होत्या, पण रात्री अचानक त्यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले.

Siddhaanth Vir Surryavanshi/Social Media

सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhant Veer Suryavanshi)

टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जिममध्ये वर्कआउट करत असताना सिद्धांतला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. अवघ्या 46 वर्षांच्या सिद्धांतला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यात त्याचा जीव वाचू शकला नाही. 11 नोव्हेंबर 2022 रोजी त्याचा मृत्यू झाला.

Aindrila Sharma

ऐंड्रीला शर्मा (Aindrila Sharma)

24 वर्षीय प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचाही याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिने दोनदा कॅन्सरशी झुंज दिली होती, ती कॅन्सरमधून बरी झाली पण हृदयविकाराच्या झटक्याने तिचा जीव घेतला.

Manju Singh

'गोलमाल' फेम मंजू सिंग (Manju Singh)

हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'गोलमाल' चित्रपटात रत्नाची भूमिका साकारून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री मंजू सिंहचाही याच वर्षी १४ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अभिनेत्री असण्यासोबतच मंजू मालिकेची निर्मातीसुद्धा होती.

Sagar Salman Pandey

सागर सलमान पांडे (Sagar Salman Pandey)

सलमान खानसारखी शरीरयष्टी असणारा सागर सलमान पांडेचेही याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जिममध्ये वर्कआऊट करत असताना सागरला हृदयविकाराचा झटका आला, त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले नाही.

Pradeep Patwardhan

प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan)

प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे ९ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले. ६४ वर्षीय प्रदीप पटवर्धन यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur: रात्री भररस्त्यात गाठलं, तिघांनी तरुणावर सपासप वार करत संपवलं; कोल्हापूर हादरले

Sreeleela: किसिक गर्ल श्रीलीलाचा नवा एलिगन्ट लूक पाहिलात का?

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधानचं घर नेमकं आहे तरी कुठं? जाणून घ्या

Bhandara Rain Alert : भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी

Pimpri Chinchwad Crime : 'तू जाड आहेस' म्हणून हिणवलं, शाळेतील वाद टोकाला गेला; एकाचा दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT