Parveen Babi Birth Anniversary Saam TV
मनोरंजन बातम्या

Parveen Babi Journey: बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त परवीन बाबीचा जीवनप्रवास

Parveen Babi Birth Anniversary: परवीन बाबीने १९७३ साली 'चरित्र' या चित्रपटातून पदार्पण केले.

Pooja Dange

Parveen Babi Life Journey: परवीन मोहम्मद अली म्हणजे परवीन बाबी बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री. अभिनेत्री परवीन बाबीचा जन्म ४ एप्रिल १९४९ रोजी गुजरात येथील जुनागढ येथे झाला.

परवीन बाबीने १९७३ साली 'चरित्र' या चित्रपटातून पदार्पण केले. परवीन बाबी 1976 मध्ये टाईम मासिकाच्या एशिया आवृत्तीच्या कव्हर पेजवर दिसली होती. हे स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री होती.

परवीन जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिने अचानक चित्रपटसृष्टीतील या झगमगत्या जगापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने अध्यात्मिक प्रवासाला सुरूवात केली. त्यानंतर तिला पॅरानोइड स्किझोफ्रेनिया झाला असल्याची बातमी आली.

22 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि डायबेटीसमुळे तिचे निधन झाले असे सांगण्यात आले.

परवीन बाबी तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबतची तिची जोडी पडद्यावर सर्वात जास्त गाजली. मात्र एक काळ असा आला की परवीनने अमिताभ बच्चन यांच्यावर धक्कादायक आरोप केले. अमिताभ गँगस्टर आहेत असा आरोप परवीनने केला होता. अमिताभ बच्चन यांना तिला मारायचे होते, असा दावाही तिने केला.

जेव्हा परवीनला मानसिक आजार असल्याचे निदान झाले तेव्हा एकेकाळी तिच्याशी रिलेशनशिपमध्ये असलेल्या महेश भट्ट यांनी तिच्या उपचार कोणतीही कसर ठेवली नाही. परवीन बाबीबाबत महेश भट्टची ही काळजी त्यांच्या 'वो लम्हे' या चित्रपटातही पाहायला मिळाली होती.

परवीन बाबी यांनी सर्वांनी प्रेम केलं. परंतु त्यांच्या अंत्यसंस्काराला मोजकेच लोक होते. परवीन अवघ्या ५ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. आई-वडिलांच्या लग्नाच्या 14 वर्षांनंतर नवसाने परवीन झाली होती. अहमदाबादमधून पदवी घेऊन परवीन मायानगरी मुंबईत आली. परवीन सुरुवातीच्या दिवसात मॉडेलिंग करायची.

जेव्हा फिल्ममेकर बीआर इशारा यांनी तिला रस्त्याच्या कडेला सिगारेट ओढताना पाहिले होते. तेथून परवीनचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु झाला. 'दीवार', 'अमर अकबर अँथनी', 'चंदी सोना', 'शान', 'सुहाग', 'काला पत्थर', 10 वर्षांत पर्वणीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. परवीन बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली. पण नंतर अचानक एक दिवस ती सेटवरून गायब झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT