Gladiator 2 On Set Accident : 'ग्लॅडिएटर' चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'ग्लॅडिएटर 2' चे शूटिंग सुरू आहे आणि चित्रपटासंबंधित माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. परंतु अलीकडेच एक बातमी समोर आली आहे, चित्रपटाच्या सेटवर एक भीषण अपघात झाला आहे.
ग्लॅडिएटरच्या सेटवर झालेल्या अपघातात 10 क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत. ज्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा क्रू मेंबर्सना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, उर्वरित चार क्रू मेंबर्सवर उपचार सुरू आहेत. '
ग्लॅडिएटर 2'च्या एका महत्त्वाच्या स्टंट सीक्वेन्सचे शूटिंग सुरू असताना हा अपघात झाला. सर्वकाही सुरळीत सुरू होते, पण अचानक अपघात झाला. या प्रकरणी चित्रपट बनवणाऱ्या 'पॅरामाउंट पिक्चर्स' या स्टुडिओनेही निवेदन जारी केले आहे. (Latest Entertainment News)
वृत्तानुसार, स्टंट सीक्वेन्स दरम्यान सहा क्रू मेंबर्स भाजले आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. चित्रपटाचे शूटिंग मोरोक्कोमध्ये सुरू होते. पॅरामाउंट पिक्चर्सच्या प्रवक्त्याने माहिती दिली की ही घटना 7 जून रोजी घडली असली तरी या अपघातात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
पॅरामाउंट पिक्चर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सेटवर सर्व संभाव्य खबरदारी घेत आहे. प्रवक्त्याने पुढे सांगितले की 'ग्लॅडिएटर 2' च्या सेटवर सुरक्षा आणि वैद्यकीय पथके उपस्थित होती. अपघाताचे वृत्त समजताच चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. कलाकार आणि क्रूच्या सुरक्षेची काळजी सर्वांनाच आहे. (Hollywood)
'ग्लॅडिएटर' हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये रसेल क्रो, जोकिन फिनिक्स, कोनी निल्सन आणि ऑलिव्हियर रीड सारखे कलाकार होते. या चित्रपटातील मॅक्सिमसच्या भूमिकेसाठी रसेल क्रो यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. चाहते 'ग्लॅडिएटर 2' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.