Ghar Bnaduk Biryani Poster Instagram/ @akashthosar
मनोरंजन बातम्या

Nagraj Manjule Movie: नागराज मंजुळेचा नवा चित्रपट येतोय; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Chetan Bodke

Nagraj Manjule Movie: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी झळकला होता. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक आणि काही गावकऱ्यांची पळापळ यातून दिसत होती. त्यामुळे नेमके या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता आता प्रत्येकालाच लागली आहे. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून येत्या ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटात नेहमीच वैविध्यपूर्ण आणि अनन्यसाधारण विषय हाताळले जातात. त्यांची हीच खासियत घेऊन झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो. या वेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन आलो आहोत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याबाबत विचारणाही होत होती. आता लवकरच या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महापालिका निवडणुकीत कोणाशी युती होणार- अजित पवारांची महत्वपूर्ण बैठक

IAS Officers Transfers: धडाधड IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ आयुक्त आणि १० डीएमसह ४६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Shreyas Iyer Surgery : श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया, नेमकं काय झालं होतं? कधी मिळणार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज?

१०x१० च्या खोलीत खरोखरच ३८ मतदार? आदित्य ठाकरे यांच्या दाव्याचा साम टीव्हीचा रियालिटी चेक|VIDEO

Ratnagiri Tourism : रत्नागिरीत 'या' ठिकाणी आहे साधा-सोपा ट्रेकिंग पॉईंट, लोकेशन आताच नोट करा

SCROLL FOR NEXT