Genelia – Riteish Deshmukh Reel: बॉलीवूडमधील सर्वात गोंडस आणि लोकप्रिय कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिनिलीया आणि रितेश देशमुख यांनी नुकताच सोशल मीडियावर एक मजेशीर रील शेअर केला असून तो काही क्षणांतच व्हायरल झाला आहे. चाहत्यांना हसवणारी त्यांची टिंगल-मस्करी आणि खट्याळ केमिस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या रीलमध्ये जिनिलीया, रितेश देशमुखवर थोडाशी रागावलेली दिसते आणि त्याला विचारते, “एवढ्या रागात कुठे निघालास?” या प्रश्नावर रितेश देशमुखचे उत्तरच नेमके आणि मजेशीर आहे. रितेश म्हणतो “टोमॅटो घेऊन आलो होतो… पण सगळे खराब आहेत, आता परत करायला जातोय!” जिनिलीया त्याला झटपट उलटतपासणी करत बोलते, “मग नीट बघून आणायचे ना!” आणि त्यावर रितेश देशमुख एकदम कडक पण खोडकर उत्तर देतो, “नीट बघून तर तुलाही आणलं होतं!”
या संवादातील त्यांची टायमिंग, एकमेकांवरचे प्रेम, मस्ती आणि सहज भाव पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी “कपल गोल्स” असं म्हटलं तर काहींनी “तुम्हाला पाहिलं की मन प्रसन्न होतं” अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या रिल्समधील नैसर्गिक विनोदबुद्धी आणि एकमेकांवरील नेहमीचा टिंगल-टोमण्याचा अंदाज हेच त्यांना इतर कपलपासून वेगळं ठरवतं.
जिनिलीया आणि रितेश देशमुख नेहमीच त्यांच्या कुटुंबातील आणि वैयक्तिक जीवनातील आनंदी क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रेम आणि विनोदाचा सुंदर मिलाफ दिसतो. म्हणूनच त्यांच्या पोस्ट्स सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल होतात.
जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची ही गोड ‘मस्ती’ चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. आणि म्हणूनच ही रील सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. यासह लवकरच रितेश मस्ती ३ आणि राजा शिवाजी या चित्रपटात झळकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.