Marathi Actor Angry on Gautami Patil: पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने झालेल्या अपघाताची चर्चा सध्या राज्यभरात रंगली आहे. ३० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गौतमी पाटील यांच्या नावावर असलेल्या कारने एका ऑटो रिक्षाला जोरदार धडकली. या भीषण अपघातात रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षेचा पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपी चालकाला काही तासांतच अटक केली. कार जप्त करण्यात आली असून ती गौतमी पाटीलच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये होत्या की नाहीत, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. याबाबत सध्या पोलिस अधिक तपास करत आहेत.
या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकरी अनेक प्रतिक्रिया करत आहेत. काहींनी गौतमी पाटीलवर टीका केली, तर काहींनी तिच्या बाजूने मत मांडले. मात्र या वादात मराठी अभिनेता पवन चौरेने थेट गौतमी पाटील यांच्यावर आरोपांचा भडिमार केला आहे. त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये संताप व्यक्त करत लिहिले, “गौतमी पाटील, तू महाराष्ट्राचा बिहार केलास. तुझी कार एका गरीब रिक्षाचालकाला उडवते आणि तू तिथून पळून जातेस. घटनेला चार दिवस झाले तरी तू साधं एक माणुसकीच्या नात्याने विचारपूस केली नाहीस. तुझे काळे धंदे लवकरच बाहेर येतील.”
पवन चौरेने पुढे पोलिस प्रशासनालाही उद्देशून म्हटले की, “या प्रकरणात तातडीने निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी. रिक्षाचालकाची तब्येत चिंताजनक आहे. जर एखाद्या सामान्य नागरिकाने असं काही केलं असतं, तर त्याला लगेच अटक झाली असती. मग या प्रकरणात वेगळा न्याय का?”
सध्या ही घटना आणि पवन चौरेची पोस्ट दोन्ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेकांनी पवन चौरेच्या वक्तव्याला पाठिंबा दिला असून, काहींनी मात्र गौतमी पाटीलला थेट दोष देणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.