Gautami Patil Dilacha Pakhru New Song Released You Tube
मनोरंजन बातम्या

Dilacha Pakhru Song Released: ‘दिलाचं पाखरू’करणार मार्केट जाम; गौतमीच्या नव्या गाण्याची तरुणांना भुरळ

Gautami Patil New Song Released: गौतमी पाटीलचं ‘दिलाचं पाखरू’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून गाण्यात गौतमीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Gautami Patil Dilacha Pakhru New Song Released

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील कायमच आपल्या डान्समुळे चर्चेत असते. नेहमीच आपल्या खास डान्स शैलीमुळे चर्चेत राहणारी गौतमी सध्या तिच्या आगामी गाण्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच सोशल मीडियावर गौतमीचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘दिलाचं पाखरु’ असे गाण्याचे बोल असून यामध्ये गौतमीचा अभिनय आपल्याला पाहायला मिळत आहे.

नेहमीच खास डान्स शैलीने चर्चेत राहणारी गौतमी सध्या तिच्या नव्या गाण्याने चर्चेत आली आहे. यामध्ये आपल्याला गौतमीच्या नखरेल अदा, तिचा कातील करणारा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. या गाण्यामध्ये गौतमीसोबत धुरंधर नावाचा अभिनेता दिसून येत आहे. गौतमीचं ‘दिलाचं पाखरु’ हे नवं गाणं धुरंधर, निधी हेडगे आणि स्वराज थिटेने गायलं असून धुरंधरनेच या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे.

सध्या गौतमीच्या नव्या गाण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत असून सोशल मीडियावर अनेक युजर्सने रिल्स ही बनवली आहे. सोशल मीडियावर हे गाणे रिल्सवर चांगलंच चर्चेत आलं आहे. गाण्याला एका आठवड्यातच ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून 5.6K एवढे लाइक्स या गाण्याला मिळाले आहे.. दरम्यान तिचं हे नवं ऐकुन चाहत्यांना गौतमी प्रेमात पडली की काय?, गौतमीच्या सर्वात जास्त जवळची व्यक्ती कोण? अशे अनेक प्रश्न विचारत आहेत.

बाबा गायकवाड दिग्दर्शित ‘घुंगरू’ मध्ये गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लोककलावंतांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ‘घुंगरू’ चित्रपटाची शुटिंग महाराष्ट्रासह परराज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात झाली आहे. तिच्यासोबत चित्रपटामध्ये कोणकोणते कलाकार दिसणार अद्याप हे तरी गुलदस्त्यात आहे. गौतमीच्या या आगामी चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

Puja Mistakes: पुजा करताना 'या' चुका करु नका, अन्यथा देवी-देवता होतील नाराज

प्रांत ऑफिससमोर आंदोलन; संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमनेसामने, नेमकं प्रकरण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT