Gautami Patil Viral News Instagram
मनोरंजन बातम्या

Viral Video: ‘तुम्हा बघून तोल माझा गेला...’; गौतमीचा भन्नाट डान्स पाहून चाहत्यांची नजर हटेना

गौतमी पाटील हिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Gautami Patil Viral Video: डान्सर गौतमी पाटील सध्या भरल्यात फॉर्मात आहे. गौतमी पाटीलचे नृत्य हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. आता मात्र तशी स्थिती राहिली नाही. अश्लील हावभाव केलेले व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र त्यानंतर गौतमीच्या करिअरचा ग्राफ वरवर जाताना दिसत आहे. सध्या तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओत तिने नक्की डान्स केलाय की, कब्बडी खेळली हेच कळत नाही असे चाहते म्हणत आहेत.

राज्यातील कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होत असतात. गौतमीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी होताना दिसते. गौतमीच्या चाहत्यांकडून कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली जाते. आता तिचा चाहतावर्ग हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात ही आहे.

खेड्यापाड्यातून तरुण मंडळी गौतमीच्या कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावतात. गौतमीचे चाहते तिच्या नाचतानाचा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आतूर असतात. गौतमीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

गौतमीचा नुकताच ‘तुम्हा बघून तोल माझा गेला’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. गौतमीच्या ‘तुम्हा बघून तोल माझा गेला’ या डान्सला तुफान पसंती मिळाली आहे. या गौतमीच्या या व्हिडिओवर (Viral Video) चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेचा विषय ठरली. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेकदा तुफान राडा झाल्याचे प्रकार घडले आहेत.

हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्जही करावा लागतो. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ होते. तर आयोजकांना अनेकदा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतो. तर अनेकवेळा मोठ्या बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढावे लागते.

गौतमी पाटील आणि वाद हे जणू समीकरणचं झालं आहे. गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात मोठी गर्दी उसळते. सतत चर्चेत असणारी गौतमी पाटीलचा मुद्दा विधानपरिषदेतही उपस्थित करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT