GauriShankar Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

GauriShankar: प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही; धडाकेबाज ॲक्शन असलेल्या 'गौरीशंकर' चित्रपटाचा टीजर Out

GauriShankar Marathi Movie : मुव्हीरूट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या गौरीशंकर या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना धमाकेदार ॲक्शन पहायला मिळणार आहे.

Shruti Kadam

GauriShankar: मराठी चित्रपटसृष्टीत आशयसंपन्न उत्तमोत्तम चित्रपटांच्या तुलनेत धडाकेबाज ॲक्शनपट कमीच होतात. आता ही उणीव 'गौरीशंकर' हा चित्रपट भरून काढणार आहे. या चित्रपटाचा धडाकेबाज टीजर लाँच करण्यात आला आहे. मुव्हीरूट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या 'गौरीशंकर' या चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी केली आहे. ऑरेंज प्रॉडक्शन्स चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. हरेकृष्ण गौडा यांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे.

'गौरीशंकर' या चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रशांत आणि निशांत यांनी संगीत दिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायांकन, संकेत कोळंबकर यांनी गीतलेखन, अमित जावळकर यांनी संकलन, राशिद मेहता यांनी अॅक्शन, अमित चिंचघरकर यांनी कला दिग्दर्शन, मेकअप नितिन दांडेकर, धनश्री साळेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी निभावली असून कार्यकारी निर्माता म्हणून सिद्धेश आयरे यांनी काम पाहिले आहे.

'प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही - तोच आहे 'गौरीशंकर'' अशी गौरीशंकर या चित्रपटाची टॅगलाईन आहे. टीजरमध्ये हाणामारी करणारा, टेन्शन घेने का नाही, देने का असं म्हणणारा रांगडा तरूण दिसतो.

मात्र हा तरूण असा का आहे, त्याची काय गोष्ट आहे याची उत्सुकता या टीजरने निर्माण केली आहे. त्याबरोबरच अॅक्शनपॅक्ड मनोरंजनाची हमी हा टीजर देतो. त्यामुळे आता २८ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT