बॉलिवूडची (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Actress Shilpa Shetty) घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचे आगमन झाले. धुमधडाक्यात शिल्पा शेट्टी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन आली. मागच्या वर्षी शिल्पा शेट्टी गणपती बाप्पाला आणायला एकटी गेली होती. पण यावर्षी ती आपला पती राज कुंद्रासोबत गणेशगल्ली येथील गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत गेली होती. याठिकाणावरून ती आपल्या बाप्पाला घेऊन घरी गेली. यावेळी शिल्पा शेट्टीला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
शिल्पा शेट्टीने आपल्या घरी गणपती बाप्पाला आणल्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी शिल्पा शेट्टी खूपच आनंदी होती. वाजत-गाजत तिने बाप्पालला आपल्या घरी नेले. शिल्पा शेट्टीने यावेळी हिरव्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर प्रिंटेड ओढणी असा लूक केला होता. शिल्पा शेट्टी या सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यावेळी शिल्पा शेट्टी हात जोडून बाप्पाचे स्वागत करताना दिसली. शिल्पा शेट्टीसोबत आलेल्या तिचा पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) लूकमुळे सध्या त्याला ट्रोल केले जात आहे. गणपती बाप्पाला आणण्यासाठी आलेल्या राजने यावेळी नेहमीप्रमाणे आपला चेहरा कॅमेऱ्यापासून लपवला होता.
राज कुंद्राने चेहरा यावेळी हुडी परिधान केली होती. त्याने डोक्यावर हुडीची कॅप घेतली होती आणि चेहऱ्याला मास्क लावले होते. राज कुंद्राचे हे असे फोटो पाहूननेटिझन्स त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले की, 'चेहरा का लपवला आहे? ' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'चेहरा तर दाखव.' दरम्यान, चेहरा लपवल्यामुळे राज कुंद्रा ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्रा मीडियापासून आपला चेहरा लपवत आहे. पुन्हा एकदा तो या लूकमध्ये दिसला. घराच्या बाहेर पडताना आजकाल राज कुंद्रा वेगवेगळ्या स्टाईलचे फेसमास्क लावताना दिसतो.
दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, शिल्पा शेट्टी लवकरच तिचा आगामी चित्रपट 'सुखी'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर शिल्पा शेट्टी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा मोठ्या पडद्यावर येत आहे. सुखी चित्रपट येत्या २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. लग्नानंतर ती कशापद्धतीने स्वत:ला विसरून कुटुंबाचा सांभाळ करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.