Ganesh Chaturthi 2025 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : 'शंकराचा बाळ आला...'; गणेशोत्सवात भक्तीत व्हा दंग, वैशाली माडे यांचं नवीन गाणं रिलीज

Abhijeet Kelkar-Yogita Chavan : अभिजीत केळकर आणि योगिता चव्हाण यांचे गणेशोत्सव स्पेशल नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे वैशाली माडे हिने गायले आहे.

Shreya Maskar

वैशाली माडे यांचं नवीन गाणं रिलीज करण्यात आले आहे.

गाण्यात अभिजीत केळकर आणि योगिता चव्हाण कलाकार पाहायला मिळत आहेत.

'शंकराचा बाळ आला...' हे गाणं नुकतेच रिलीज झाले.

सध्या जगभरात सर्वत्र गणेश उत्सवाचा (Ganesh Chaturthi 2025) आनंद पाहायला मिळत आहे. सर्वजण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत. अशात आता गणपती बाप्पाच्या भक्तीचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वैशाली माडे (Vaishali Mhade) यांचे 'शंकराचा बाळ आला' (Shankaracha Bal Ala ) हे गाणे श्रीगणेश गीत रसिकांच्या भेटीला आले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मराठी गायिका वैशाली माडे यांच्या सुरेल आवाजात 'शंकराचा बाळ' हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. मंदार चोळकर यांनी गाण्याची शब्दरचना केली असून वरुण लिखाते यांचे सुंदर संगीत याला लाभले आहे. या गाण्यात अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) आणि योगिता चव्हाण (yogita Chavan ) यांनी आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत.

'शंकराचा बाळ' गाण्यात कोकणात उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव दाखवण्यात आला आहे. मात्र हे केवळ एक गाणं नसून त्यातून एक हृदयस्पर्शी कथा सांगितली आहे. जी एका आईची, जी सैनिक आहे. गणेशोत्सवासाठी घरी आलेली ही आई बाप्पाची सेवा करून नंतर पुन्हा देशसेवेसाठी निघते. भक्ती, कुटुंब आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम 'शंकराचा बाळ' गाण्यात पाहायला मिळत आहे.

'शंकराचा बाळ' या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक गाण्याचे कौतुक करताना दिसत आहेत. गणपती बाप्पा हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकजण गणपतीची आतुरतेने वाट पाहत असतो. गणपतीचे 11 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळते. मोदकांचा गोडवा नात्यात गोडवा घेऊन येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याची हत्या, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

Maharashtra Rain Live News : - अनिलकुमार पवार, वाय एस रेड्डी, सिताराम गुप्ता आणि अरूण गुप्ता यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Crime : प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीला संपवलं; क्राईम शो पाहून रचला हत्येचा कट

Thane Water Supply : ठाण्यात काही दिवस अनियमित पाणीपुरवठा, कारण काय?

Couples In Hotels: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं एकत्र हॉटेलमध्ये राहणं गुन्हा आहे का?

SCROLL FOR NEXT