Prabha Shivnekar Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prabha Shivnekar Passed Away : 'गाढवाचं लग्न' मधील गंगी काळाच्या पडद्याआड, मराठी रंगभूमीवर कोसळला दु:खाचा डोंगर

Prabha Shivnekar Dies : मराठी लोकरंगभूमीवरील सुप्रसिद्ध तमाशा कलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

मराठी नाट्यसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी लोकरंगभूमीवरील सुप्रसिद्ध तमाशा कलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी पिंपरी चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आणि दमदार संवादफेकीच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनात त्यांनी घर निर्माण केले आहे.

प्रभा शिवणेकर यांच्यावर मुळशी तालुक्यातील भालगुडी या जन्मगावी शुक्रवारी (३१ मे) अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रभा शिवणेकर यांना मराठी रंगभूमीवर गाढवाचं लग्न आणि झाशीची राणी या नाटकाने विशेष प्रसिद्धी दिली. गाढवाचं लग्न नाटकातील गंगी हे पात्र त्यांनी विशेष गाजवलं. प्रभा शिवणेकर मराठी लोकनाट्यसृष्टीमध्ये आणि रंगभूमीमध्ये तब्बल ७ दशकं सक्रिय होत्या. त्यांनी अनेक प्रसिद्ध तमाशा फडात काम केलेलं होतं.

त्यांच्या अभियाची चर्चा फक्त राज्यात आणि देशातच नाही तर परदेशातही होती. जपान आणि अमेरिकेतले कलावंत प्रभा शिवणेकर यांना 'भारताच्या पॉलिमुनी' नावानेच ओळखायचे. १९५० ते ८० च्या दशकातील 'गाढवाचं लग्न' नाटकातील वगनाट्यातील गंगीच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update:विलास घुले खून प्रकरणी आज न्यायिक मागणीसाठी केजमध्ये निघणार मोर्चा

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT