Border 2 Latest News Instagram
मनोरंजन बातम्या

Border 2: सनी देओलचा स्वॅगच न्यारा, ‘गदर २’नंतर आणखी एका सिक्वेलमध्ये झळकणार

Border Sequel Update: ‘गदर २’ च्या घवघवीत यशानंतर सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ची चर्चा सुरू झाली आहे.

Chetan Bodke

Border 2 Latest News: अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असला तरी, चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले आहेत. गदर २ ने एका आठवड्यातच ३०० कोटींचा पल्ला गाठला आहे. एकंदरीत बॉक्स ऑफिसवर सिक्वेलची धमाकेदार कमाई सुरू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच, सनी देओलच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज येत आहे. ‘गदर २’ च्या घवघवीत यशानंतर सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ची चर्चा सुरू झाली आहे.

‘गदर २’ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, सनी देओल, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ स्टारर ब्लॉकबस्टर ‘बॉर्डर’ चित्रपटाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘गदर २’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ‘बॉर्डर’चे दिग्दर्शक जे.पी.दत्ता हे ‘बॉर्डर २’च्या तयारीला लागले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बॉर्डर’चे दिग्दर्शक जे.पी.दत्ता ‘बॉर्डर २’ चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. जे.पी.दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बॉर्डर’ला खूप यश मिळाले होते.

अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ‘बॉर्डर’चा सिक्वेल भेटीला येणार असल्याने चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटामध्ये सनी देओल अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही भाग घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

चित्रपटात सनी देओलने एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचे पात्र साकारले होते. चित्रपटात सनी देओलसह सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, पुनीत इस्सार आणि अक्षय खन्नासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत होते. अनेक वर्षांनंतर सनी देओल पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करीत आहे.

‘बॉर्डर २’बद्दल तीन वर्षांपूर्वी ही चर्चा सुरु होती. पण अखेर ‘गदर २’नंतर ‘बॉर्डर २’बद्दलच्या चर्चांना अधिकच चर्चा उधाण आलं आहे. ‘बॉर्डर’मध्ये सुपरहिट वॉर ड्रामा दाखवण्यात आला होता, चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर बेतली होती. कथेमुळेच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगल्ला गल्ला जमावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT