सनी देओलचा गदर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस वाढतच आहे. चौथ्या दिवशी देखील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केले आहे.
वीकेंडच्या 134 कोटी रुपयांच्या कलेक्शननंतर, गदर 2 ने गती अजिबात कमी झालेली नाही. सोमवारी अंदाजे 39 कोटी रुपये कमावले, असे इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवालात लिहिले आहे.
सोमवारचे गदर २ एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता रु. 173 कोटी झाले आहे. या आकड्याने अनेकांच्या अपेक्षेपलिकडे जाऊन कामगिरी केली आहे. ज्यांना गदर 2 कडून भरपूर कलेक्शनची अपेक्षा होती पण ती तितक्या वेगाने होईल असे वाटले नव्हते.
बॉक्स ऑफिस इंडियानुसार सोमवारी चित्रपटाचे कलेक्शन "ऑल टाइम रेकॉर्ड" असेल, कारण सुट्टीच्या दिवशीही मोठ्या चित्रपटांना 30 कोटी नेट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
चार दिवसांच्या कलेक्शनने आता स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्रपट मंगळवारी मोठ्याप्रमाणावर कलेक्शननं करेल असे म्हटले जात आहे. 15 ऑगस्टला गदर २चे किमान रु. 55 कोटी टार्गेट आहे. ज्यामुळे पाच दिवसांत एकूण कमाई रु. 230 कोटींवर नेईल, अशी माहिती सॅकनील्कने दिली आहे.
गदर 2 आता शाहरुख खानच्या पठानच्या एकूण 524 कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनसह बिट करून बॉलिवूडचा हिट चित्रपट ठरू शकतो. बॉलिवूड बॉक्स ऑफिस विश्लेषक तरण आदर्श यांना विश्वास आहे की गदर 2 पहिल्या आठवड्यात 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल आणि स्वातंत्र्यदिनी मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री होईल. (Latest Entertainment News)
त्यांनी ट्विट केले होते, "आतापर्यंत हे स्पष्ट आहे - जर फक्त गदर2 रिलीज झाला असता, तर दुसर्या हिंदी चित्रपटाशी टक्कर नसती तर - त्याच्या एकूण वीकेंड कलेक्शन आणखी ₹30 कोटी सहज वाढले असते."
2001 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला गदर एक प्रेम कथाचा सिक्वेल 1971 मध्ये बांगलादेश आणि पूर्व पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
गदर 2 हा सनी देओलचा त्याच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा हा त्याचा पहिला चित्रपट आहे. खरं तर, चित्रपटाची क्रेझ पाहता, उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये थिएटर्सनी पहाटे आणि रात्री उशिरा देखील शो ठेवले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.