Marathi New Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi New Movie: गाव सोडून शहराकडे जाणाऱ्या तरूणाईसाठी, ‘गाव बोलावतो’; मोशन पोस्टर रिलीज

Gaav Bolavato New Marathi Movie: गावातील एखादा मुलगा शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने शहराकडे गेला की तो तिकडचाच होतो. त्याचे कुटुंब, आई-वडिल त्या अप्रगत गावात दिवस ढकलताना दिसतात.

Manasvi Choudhary

सध्या गावाकडची बरीचशी तरूणाई ही शहराकडे येऊन शिक्षण घेताना, नोकरी करताना दिसते. यामुळे अनेक गावांमध्ये फक्त वयस्कर लोकच दिसतात, आणि त्यामुळे गावांकडे आजही सगळ्याच प्रकारच्या प्रगतीचा अभाव दिसतो. एकीकडे शहरं वाढतचं चालली आहेत, तर दुसरीकडे गावं ओसाड पडताना दिसू लागली आहेत. याच गंभीर विषयावर भाष्य करणारा ‘गाव बोलावतो’ हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे आज (ता. २१) अनावरण करण्यात आले.

गावातील एखादा मुलगा शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने शहराकडे गेला की तो तिकडचाच होतो. त्याचे कुटुंब, आई-वडिल त्या अप्रगत गावात दिवस ढकलताना दिसतात. मुलाने गावाकडे यावं, शेतीकडे लक्ष द्यावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं पण इतर गोष्टींना प्राधान्य देणारी तरूण पिढी शहराच्या झगमगाटात हरवून जाते आणि गावाचं मन जाणू शकत नाही. भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे, श्रीकांत यादव, किरण शरद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गाव बोलावतो’ चित्रपटात ग्रामीण प्रश्नांवर आणि समस्यांवर भाष्य करण्यात आलंय त्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.

संस्कार वाहिनी प्रोडक्शन आणि फिल्मिटेरियन मीडिया वर्क्स निर्मित ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद माणिकराव हे आहेत. तर निर्माते प्रशांत मधुकर नरोडे, शंतनू श्रीकांत भाके हे आहेत, तर व्हिज्युअल बर्ड्स इन्स्टिट्यूट अँड स्टुडिओ, अमित मालवीय, प्रवीण इंदू, गणेश इंगोले, सुधीर इंगळे, तुषार खेरडे, दिनेश राउत हे सहनिर्माते आहेत. ७ मार्चपासून हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT