Sharad Kelkar And Prabhas  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sharad Kelkar And Prabhas Upcomimg Movie: शरद केळकर पुन्हा बनला प्रभासचा आवाज

'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात काम करण्यासोबतच शरद केळकर 'आदिपुरुष' या आगामी चित्रपटातही प्रभासला आपला आवाज देणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बाहुबली चित्रपटानंतर अभिनेता शरद केळकर आता आदिपुरुष चित्रपटात प्रभासला आवाज देणार आहे. अलीकडेच शरदने प्रभाससोबत दुसऱ्यांदा काम कारण्याविषयी सांगितले होते.

शरद केळकरने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आदिपुरुषाच्या निर्मितीविषयी सांगितले आहे, “मी आदिपुरुषसाठी खूप उत्सुक आहे. त्यात मी आणि ओम (दिग्दर्शक ओम राऊत) तान्हाजी चित्रपटानंतर पुन्हा एकत्र काम करत आहोत.

भारतातील प्रत्येकासाठी श्रीरामाचा आवाज असणे ही अभिमानाची बाब आहे. श्री रामचा आवाज होण्याचे भाग्य मला मिळाले आहे आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी ओमचा आभारी आहे. मी अशा करतो की मला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यासाठी श्री रामकडून थोडी ताकद मिळेल.”

आदिपुरुषचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. व्हीएफएक्सपासून ते सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेपर्यंत नेटिझन्सनी टीका केली आहे.

शरद केळकरला बाहुबली या चित्रपटाविषयी विचारले तेव्हा तो म्हणाले, “बाहुबलीने एक अभिनेता म्हणून माझ्यासमोर एक वेगळा दृष्टीकोन आणला आणि आवाजही असा प्रभाव टाकू शकतो हे सिद्ध झाले. मला बाहुबलीचा आवाज असे विशेषण मिळाले आहे. एवढ्या मोठ्या चित्रपटाचा भाग बनणे नेहमीच छान असते आणि याचा सर्वाधिक आनंद मला होता. मला राजामौली सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि हीच सर्वात मोठी सर्वकाही आहे." (Movie)

शरद केळकर सध्या त्याच्या आगामी मराठी चित्रपट 'हर हर महादेव'च्या तयारीत व्यस्त आहेत. या चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर आणि सायली संजीव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT