Bigg Boss Marathi 5 Wild Card Contestant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरातला पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक कोण ? केव्हा आणि कधी येणार ?

Bigg Boss Marathi 5 Wild Card Contestant : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. दुसऱ्या आठवड्यापासून सोशल मीडियावर वाईल्ड कार्ड स्पर्धकाची चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. दुसऱ्या आठवड्यापासून सोशल मीडियावर वाईल्ड कार्ड स्पर्धकाची चर्चा सुरू आहे. 'भाऊचा धक्का'वर रितेशने बिग बॉसच्या घरात लवकरच एक नवा स्पर्धक येणार असे सांगितले होते. पण नेमका कोण आणि केव्हा येणार या बाबत सांगितले नव्हते. सध्या सोशल मीडियावर एका स्पर्धकाची जोरदार चर्चा सुरू आहे. जाणून घेऊया नेमका कोण आहे तो स्पर्धक...

सोशल मिडिया एन्फ्लूएन्सर आणि रेडिओ जॉकी सुमित येणार अशी चर्चा सुरू आहे. नुकतंच सुमितने एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत त्याने खरंच तो बिग बॉसच्या घरात जाणार का ? याबद्दल सांगितले आहे. पण या मुलाखतीमध्ये त्याने बिग बॉसच्या घरात जाणार की नाही ? याची चाहत्यांना हिंट दिली आहे. त्या शिवाय जर तो बिग बॉसच्या घरात गेलाच तर कोणत्या ग्रुपमधून खेळणार याबद्दलही त्याने भाष्य केलं आहे.

मुलाखतीत सुमित म्हणाला की, "बिग बॉसच्या घरात दोन वेगवेगळ्या टीम्स आहेत. सर्वांनाच माहित आहे, ए टीम जरा जास्तच स्ट्रॉंग आहे आणि बी टीममध्ये अजून गेम उतरलेला नाही. वैभव चव्हाण माझा मित्र बिग बॉसच्या घरात आहे. पण त्याने चुकीची टीम निवडली. मला वाटलं होतं की तो कुठे तरी टीम लीडर म्हणून आपल्या समोर येईल. पण तसं काही झालं नाही. मी जर बिग बॉसच्या घरात जर गेलो तर नक्कीच बी ग्रुपमध्ये मी जाईल."

"कारण, ए टीममध्ये ९० % स्पर्धक खूप जबरदस्त स्पर्धक आहे. त्यांना गेम कसा खेळायचा, ताकदीचा कसा वापर करायचा, दंगा कसा करायचा अशा सर्व गोष्टी त्यांना ठाऊक आहे. पण बी टीममध्ये सर्वच साधी भोळी माणसं आहेत. अनेकांना वाटतं की, मी बी टीममध्ये जावं. कारण, विरूद्ध टीममधील जे स्ट्रॉंग कॉन्टेस्टंट आहेत त्यांना तोडीस तोड उत्तर देणारा स्पर्धक असावा म्हणून ते मला त्या ग्रुपमध्ये पाहत आहेत. बाकी मी कोल्हापूरचा असल्याने बिग बॉसच्या घरात चांगलाच राडा करेल, यात शंका नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT