HARYANVI SINGER ANKIT BALIYAN SHOT DEAD IN SHAMLI | SHAMLI SHOOTING NEWS saam tv
मनोरंजन बातम्या

Firing On Singer: जिमबाहेर घात लावून बसले, बाहेर येताच गायकावर झाडल्या धाडधाड २० गोळ्या

Shamli Shooting Singer Dead : शामलीमध्ये जिममधून बाहेर गायकवर गोळीबार झालाय. या अंदाधुंद गोळीबारात त्याचा मृत्यू झालाय. हल्लेखोरांनी त्याच्यावर २० गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

Bharat Jadhav

  • शामलीमध्ये जिमबाहेर हरियाणवी गायक अंकित बालियानची हत्या

  • अंकित बालियानवर २० हून अधिक गोळ्या झाडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा

  • जिममधून बाहेर पडताच अंकित बालियानवर हल्ला

पश्चिम उत्तर प्रदेशातील शामली येथे हरियाणवी गायक अंकित बालियान याची गोळ्या झाडून हत्या झालीय. सदर कोतवाली भागात ही हत्येची घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, अंकित नेहमीप्रमाणे जिममध्ये गेला होता. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास तो बाहेर पडल, त्यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी २० हून अधिक गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली. दरम्यान गोळ्या लागल्याने अंकित गंभीर जखमी झाला. तेथील उपस्थित लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकित बालियानवर हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सदर कोतवाली परिसरातील 'नाला पटरी' (नाल्यालगतचा रस्ता) भागात घडल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

या गाण्यामुळं प्रसिद्धीच्या झोतात

अंकित बालियान हा मूळचा शामली येथील बंतीखेडा गावचा रहिवासी होता. त्यानंतर तो हरियाणातील रोहतक आणि सोनीपतला राहायचा. तिथेच गायक आणि कलाकार म्हणून जडणघडण झाली. त्यानं हरयाणवी मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक लोकप्रिय गाणी त्यानं गायली. तसंच अभिनयही केला. अंकित याचं ‘भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्यानंतर त्याचे नशीब चमकले होते. अंकितच्या घातपाताच्या वृत्तानं हरियाणवी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अंकितच्या हत्येनं त्याचं कुटुंब आणि नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिवसाढवळ्या त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अंकित हा मूळचा शामली जिल्ह्यातला बंतीखेडा गावचा रहिवासी होता. संगीत क्षेत्रात त्यानं आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. गीतकार आणि संगीतकार म्हणूनही त्यानं काम केलं. त्याचा देशी अंदाज आणि गायकीच्या शैलीनं तो चांगलाच लोकप्रिय झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कळंबा कारागृहात कैद्यांकडून अधिकाऱ्याला मारहाण

महापालिकेच्या महासभेत हाय व्होल्टेज ड्रामा! भाजप-सेनेत शाब्दिक चकमक; भाजप नगरसेवकाचं निलंबन

Santosh Pandit: युट्युबर संतोष पंडित यांना जामीन मंजूर, १५ दिवसांनंतर जेलबाहेर

Cranberries Benefits : वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत, 'हे' एक लाल फळ ठरेल हेल्थ चेंजर

Dombivli Crime : डोंबिवलीत धक्कादायक घटना, 4 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार; शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय नराधमाला अटक

SCROLL FOR NEXT