tiger shroff Saam Tv
मनोरंजन बातम्या

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

Tiger Shroff Shooting : जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झालाय. अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आलाय.

Bharat Jadhav

मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार झालाय. या गोळीबारात टायगर श्रॉफ आणि रिक्षा चालक जखमी झालाय. हाती आलेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ हा फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. या अचानक झालेल्या हल्ल्यात अभिनेता टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफला गोळी लागली नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफवर गोळीबार केला. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही दिवसापूर्वीच वडाळामध्ये गोळीबारीची घटना घडली होती. आता बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांनी गोळीबार केलाय. यामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

दरम्यान जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे टागर श्रॉफ हा फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता, त्यावेळी त्याच्यावर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर हे दुचाकीवरून आले होते. त्यांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला. यात टायगर श्रॉफचा चालक जखमी झालाय.

दरम्यान मागील वर्षी अभिनेता टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी आली. होती. त्या धमकी प्रकरणात पंजाबमध्ये एकाला अटक करण्यात आली होती. खार पोलिसांच्या पथकाने याप्रकरणात आरोपीला पंजाबमधून ताब्यात घेतले होतं. आरोपी सुरक्षा रक्षक होता, कामावर गैरहजर असल्यामुळे त्याचा पगार कापण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT