Sadashiv Amrapurkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sadashiv Amrapurkar: अभिनेत्याच्या घराला भीषण आग, नेमकं काय घडलं?

Sadashiv Amrapurkar Movie: या आगीमध्ये अभिनेत्याच्या घरातील वस्तूचे मोठे नुकसान झाले. याचवेळी घरामध्ये अडकलेल्या एका महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप सुटका करण्यात आली.

Priya More

Fire At Sadashiv Amrapurkar House:

मराठी सिनेसृष्टीचे (Marathi Film Industry) लोकप्रिय दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) यांच्या घराला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) येथील त्यांच्या फ्लॅटला अचानक आग लागली. या आगीमध्ये अभिनेत्याच्या घरातील वस्तूचे मोठे नुकसान झाले. याचवेळी त्यांच्या घरामध्ये अडकलेल्या एका महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप सुटका करण्यात आली. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव अमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील घराला भीषण आग लागली. हे घर सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने आहे. अहमदनगर येथील सुमन अपार्टमेंटमध्ये त्यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये भाडेकरू राहत होते. ज्योती भोर पठारे असं या भाडेकरूचे नाव आहे. सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला मंगळवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आग वाढत चालल्यामुळे अग्निशमन दलाला कॉल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ आग अटोक्यामध्ये आणली. या आगीमध्ये भाडेकरू ज्योती भोर पठारे या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांकडून देण्यात आली आहे.

तर, सुमन अपार्टमेंटमध्ये सदाशिव अमरापूरकर यांच्या मालकीचे एकूण चार फ्लॅट आहेत. याच अपार्टमेंटमध्ये मकरंद खेर देखील राहतात. या आगीमध्ये जखमी झालेल्या ज्योती भोर पठारे यांच्यावर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. धुरामुळे त्यांना श्वसनाला त्रास होत होता. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म ११ मे १९५० साली अहमदनगर येथे झाला होता. त्याना अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात नाटकाने केली. जवळपास ५० नाटकांमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. ३ नोव्हेंबर २०१४ रोजी फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले. ६४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT