boney kapoor credit card fraud news Twitter/ @BoneyKapoor
मनोरंजन बातम्या

Cyber Crime: बोनी कपूर यांना पावणे चार लाखांचा गंडा; क्रेडीट कार्डद्वारे फसवणूक

Boney Kapoor Latest News | गुडगाव येथील एका कंपनीच्या खात्यात पैसे गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सुरज सावंत

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्या क्रेडिट कार्डची (Credit Card) गोपनीय माहिती मिळवून चोरट्यांनी त्याद्वारे पावणे चार लाखांचे व्यवहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी बुधवारी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा (Cyber Crime) दाखल केला आहे. मार्च महिन्यात निर्मात्याला त्याच्या बँक खात्यातून पैसे काढल्याचे कळले. त्यांनी याबाबत बँकेला विचारले. या फसवणूकीची माहिती मिळाल्याननंतर त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.

हे देखील पाहा -

बोनी कपूर यांना क्रेडिट कार्डच्या माहितीची कुणीही विचारणा केली नाही. तसेच कोणताही फोन त्यांना आला नव्हता. पण कार्ड वापरताना कोणीतरी डेटा मिळवला असल्याचा त्यांना संशय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. बोनी यांच्या खात्यातून ९ फेब्रुवारीला सायबर चोरट्यांनी पाच व्यवहार करून त्याद्वारे तीन लाख ८२ हजार रुपये हस्तांतरित केले आहेत. गुडगाव येथील एका कंपनीच्या खात्यात पैसे गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भूकंपाने क्षणात होत्याचं नव्हतं केलं; १३० हून अधिक जणांचा मृत्यू, २००० जण बेपत्ता; भीषण दृश्यांनी जग सुन्न

Dark knuckles: कोपर आणि गुडघे काळे पडलेत? याचं कारण फक्त घाण नाही; ‘या’ गंभीर समस्या असू शकतात

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात; ४ तरुणांचा मृत्यू

मेंदू सुपरफास्ट होण्यासाठी सकाळी चहा-कॉफीऐवजी प्या 4 हेल्दी ड्रिंक्स

Accident : साताऱ्यात मध्यरात्री भयंकर अपघात, महागड्या कारचा चक्काचूर, पुण्यातील ४ मित्रांचा जागीच मृत्यू, २ गंभीर

SCROLL FOR NEXT