लग्नाआधी विकी आणि कतरिनाच्या विरोधात तक्रार दाखल ! वाचा काय आहे प्रकरण? Saam Tv
मनोरंजन बातम्या

लग्नाआधी विकी आणि कतरिनाच्या विरोधात तक्रार दाखल ! वाचा काय आहे प्रकरण?

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबरला राजस्थानच्या रॉयल फोर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

वृत्तसंस्था

जयपूर : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबरला राजस्थानच्या रॉयल फोर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. वृत्तानुसार, आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. कतरिना आणि विकीचा संगीत सोहळा लवकरच सुरु होणार आहे. यासोबतच लग्नाला येणारे पाहुणेही विमानतळावर स्पॉट होत आहेत. विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे, राजस्थानचे वकील नेत्राबिंद सिंग जौदान यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात या कपल विरोधात तक्रार दाखल केली आहे.

हे देखील पहा-

चौथ मंदिराजवळ 6 ते 12 डिसेंबर दरम्यान रास्ता अडवून ठेवल्याप्रकरणी वकिलाने कपल विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, वकिलाने सिक्स सेंस फोर्ट बड़वाराचे हॉटेल व्यवस्थापक तसेच कतरिना कैफ, विकी कौशल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार, हॉटेल सिक्स सेन्स मंदिराच्या मार्गावर येते. हॉटेल व्यवस्थापकाने 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे हॉटेल सिक्स सेन्स येथून मंदिराकडे जाणारा रस्ता लग्नसराईमुळे पुढील सहा दिवस बंद राहणार आहे आणि त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास अडचण येत आहे असे म्हंटले आहे.

पुढे वकिलाने आपल्या तक्रारीत मंदिराकडे जाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती केली आहे. तसेच विकी-कतरिनाच्या लग्नाबाबत आपला कोणताही वैयक्तिक राग नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चौथ का बारवरा हे अनेक शतकं जुने चौथ माता मंदिर आहे. त्यामुळे मंदिरात दररोज शेकडो भाविक आणि यात्रेकरी प्रार्थना करण्यासाठी येतात, असे त्यांनी म्हंटल आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT