Female fan kisses Shah Rukh Khan at Dubai event Twitter
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Fan Kiss Video Viral: महिलेला तुरुंगात डांबलं पाहिजे; भर कार्यक्रमात शाहरूखला किस केल्याने नेटकरी भडकले

Shah Rukh Khan In Dubai: दुबईत मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडच्या जाहिरातीसाठी शाहरूख उपस्थित होता.

Pooja Dange

Female fan kisses Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान नेहमीच त्याच्या कोणत्या ना कोणत्या कारणाने लाईमलाईटमध्ये येत असतो. सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चाहतेही त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. नुकताच शाहरूखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

अभिनेता शाहरूख खानने त्याच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीमुळे त्याचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शाहरूखचा जबरा चाहतावर्ग आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर अभिनेता शाहरूख खानचे चाहते आहेत. शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी होते. (Latest Entertainment News)

सध्या सोशल मीडियावर शाहरूखचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. दुबईत मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडच्या जाहिरातीसाठी शाहरूख उपस्थित होता. दरम्यान, किंग खानला भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली तोच एका शाहरूखच्या महिला चाहतीने त्याला किस केले.

शाहरूखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेंच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये शाहरूख त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि त्याच्या अंगरक्षकांसोबत दिसतो आहे. यावेळी चाहत्यांनी गर्दी केली होती.

याचदरम्यान, शाहरूखची एक महिला चाहती त्याच्या जवळ आली, आणि 'मी तुला किस करू का' असे विचारते शाहरूख खान काही बोलणार तेवढ्यातच ती त्याला किस करते. सोशल मीडियावर शाहरूखचा महिला किस घेतानाचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे

शाहरूखचा सोशल मीडियावरचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत तर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये हिला तुरूंगात डांबले पाहिजे, तर दुसऱ्याने हे योग्य नाही अस म्हटलं आहे.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर जानेवारीमध्ये त्याचा पठान प्रदर्शित झाला. तर त्याचे डंकी, जवान आणि टायगर 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT