Sonam Kapoor Diet Plan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor Diet Plan : उफ्फ तेरी अदा...सोनमच्या स्टाईलवर चाहते फिदा, काय आहे हेल्दी डाएट रुटिन

Sonam Kapoor Fitness Tips : फिटनेस क्वीन सोनम कपूर नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. तिला नेहमी फिट ठेवणारा तिचा डाएट प्लान जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर (Sonam Kapoor ) नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांना भुरळ घालत असते. सोनम आपल्या स्टाईल आणि डाएट विषयी अनेक मुलाखतीत बोलत असते. तसेच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती या विषयांवर वेळोवेळी व्यक्त होत असते. मुलाला जन्म दिल्यानंतर सोनमने हेल्दी डाएट फॉलो करून आपली फिगर मेंटेन ठेवली आहे.

सोनमच्या या हेल्दी डाएट (Diet Plan ) विषयी जाणून घेऊयात. सोनमने शेअर केलेल्या एका व्हिडिओनुसार, सोनमचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. सोनमच्या दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने होते. हे लिंबू पाणी केवळ पचनसंस्था सुरळीत आणि शरीर हायड्रेट ठेवत नाही तर यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. त्यानंतर ती कॉफीमध्ये चॉकलेट टाकून कॉफीचा आस्वाद घेते. कॉफी प्यायल्यावर काही वेळाने सोनम ड्रायफ्रूट्स खाते. ज्यात विशेषता काजू-बदामचा समावेश असतो. यामुळे शरीरातील प्रोटीन आणि फायबर वाढते.

सोनम नाश्त्याला कधीकधी अंडी आणि टोस्ट खाते. सोनम सकाळचा नाश्ता 9.30 ते 10.00 पर्यंत करते. तर 1.30 ते 2.00 ती आपले दुपारचे जेवण करते. संध्याकाळची कॉफी सोनम सुमारे 4 च्या आसपास पिते. तर संध्याकाळचा नाश्ता 5.00 ते 5.30 वेळे दरम्यान करते. सोनम नेहमी जेवण्याची वेळ पाळावी असे सांगत असेत. कारण यामुळे शरीर निरोगी राहते. तसेच सोनम रात्रीचे जेवण 7 ते 7.30 च्या दरम्यान करते. ती आपल्या आहारात जास्तीत जास्त चिकनचा समावेश करते. यासोबतच सोनम नेहमी चाहत्यांना चांगल्या आरोग्यासाठी दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देते. ज्यामुळे शरीर, त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर चमक येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT