सध्या बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांची चर्चाही सुरु असते. अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरू आहेत आणि अनेक रिलीजकरिता सज्ज आहेत. या सगळ्यामध्ये अक्षय कुमारचा नवीन चित्रपट प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पण एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असतानाच दुसरीकडे मात्र पंजाबमध्ये या चित्रपटाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रचंड विरोध झाला आहे. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब मधील होशियारपूर जिल्ह्यात या चित्रपट विरोधामध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रोहित शेट्टी या चित्रपटाचे स्क्रिनिंग करणे कठीण झाले आहे.
हे देखील पहा-
किसान विधेयकाच्या विरोधात आंदोलनात अक्षय कुमारने पाठिंबा न दिल्याने शेतकरी संताशनिवारी होशियारपूरच्या स्वर्ण थिएटरमध्ये ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे लाईव्ह स्क्रिनिंग थांबवण्यात आले आहे. अभिनेत्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा न दिल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी अक्षय कुमार विरोधामध्ये संताप व्यक्त केला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारती किसान युनियनच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शन विरोधामध्ये शहीद उधम सिंह पार्क ते स्वर्ण थिएटरपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. याचवेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी चित्रपटगृहा बाहेर चित्रपटाचे पोस्टरही देखील फाडले आहे.
यानंतर त्यांनी सिनेमा हॉलच्या व्यवस्थापनाकडून जबरदस्तीने चित्रपटाचे थेट प्रदर्शन थांबवण्यात आले आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द होत नाही. तोपर्यंत अक्षय कुमारच्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही, असा आग्रह संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी धरला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने शुक्रवारी जोरदार सुरुवात केली होती. शनिवारी चित्रपटाचा दुसरा दिवस होता.
अपेक्षेप्रमाणे पहिल्या दिवसाएवढा दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात कमाई झाली आहे. दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला होताना दिसत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६.२९ कोटींचा गल्ला जमावलेला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.